बुधवारपासून भारत-न्यूझीलंड आमनेसामने (फोटो- सोशल मिडिया)
दोन्ही संघाचा इतिहास पाहिल्यास भारत आणि न्यूझीलंड हे संघ वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत मजबूत आणि शानदार खेळ करण्यासाठी ओळखले जातात. दोन्ही संघ एकमेकांना नेहमीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान आता पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी पाहुयात.
भारताचा विजय- 14 सामने
भारताचा पराभव – 26
अनृणित सामने – 5
बुधवारपासून भारत न्यूझीलंड वनडे सिरीज सुरू होणार आहे. टीम इंडियासाठी रोहित आई विराटची फलंदाजी अत्यंत महत्वाची असणार आहे. कर्णधार शुभमन गिल देखील अत्यंत शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. मिडल ऑर्डरमध्ये केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नमन धीर यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार असणार आहे.
स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सिरीजमध्ये खलटणा दिसणार नाहीये. त्यामुळे भारताची गोलंदाजी थोडीशी कमकुवत दिसून येईल असे म्हटले जात आहे. मात्र मोहम्मद सिराजवर पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेण्याची जबाबदारी असणार आहे. सिराजला साथ देण्यासाठी संघात अर्शदीप सिंह, गुरनूर बरार आणि अंशुल कंबोज यांच्यासारखे तरूण आणि प्रतिभावान गोलंदाज देखील सिराजला साथ देणार आहेत. फलंदाजीच्या जोरावर भारत कितीही मोठी धावसंख्या उभारू शकत असला, तरी न्यूझीलंडच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजीची कसोटी लागणार आहे.
Ans: भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज 4 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
Ans: भारत-न्यूझीलंड यांच्यातील आकडेवारीनुसार, भारताचे पारडे जड दिसून येते.






