Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजयही भारताचा, विक्रमही IND vs PAK सामन्याचाच; एड्जबॅस्टन निळ्या रंगात न्हालं! महिला विश्वचषकात सर्वाधिक प्रेक्षकांची नोंद

IND-W v PAK-W breaks attendance record in Women’s T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव करत दमदार विजय नोंदवला. एड्जबॅस्टनवरील या हायव्होल्टेज सामन्याने प्रेक्षकसंख्येचाही नवा इतिहास रचला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 15, 2026 | 01:41 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
  • विक्रमही IND vs PAK सामन्याचाच
  • महिला विश्वचषकात सर्वाधिक प्रेक्षकांची नोंद
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचा ग्रुप स्टेजचा ६ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (१४ जून) पार पडला. या हायव्होटेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करुन भारताने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आणि महिला टी-२० विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली. स्मृती मानधनाची शानदार फलंदाजी आणि दिप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच विशेष आकर्षण असते. महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या महासंग्रामाने केवळ मैदानावरील रोमांचच नाही तर प्रेक्षकसंख्येचाही नवा इतिहास घडवला.

IND vs AFG ODI: आईचा फोन आला अन् पत्रकार परिषद थांबली; नीतीश रेड्डीचा भावनिक क्षण, Video व्हायरल

भारत-पाकिस्तान सामन्यात नवा विक्रम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच उत्साह आणि भावनेने भरलेला असतो. महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या महामुकाबल्यात फक्त मैदानावरील रोमांचच नाही तर प्रेक्षकसंख्येनेही नवीन विक्रम नोंदवला आहे. एडजबॅस्टन स्टेडियमवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला १८,८१४ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, जी महिला टी-२० विश्वचषक इतिहासातील कोणत्याही ग्रुप टप्प्यातील आतापर्यंतची सर्वाधिक उपस्थिती ठरली. यापूर्वी, २०२४ च्या टी२० विश्वचषकादरम्यान दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला १५,९३५ प्रेक्षक उपस्थित होते.

Statement win from India as they defeat arch-rivals Pakistan to kick off their #T20WorldCup campaign 👊 📝: https://t.co/GWzpFgR2ei pic.twitter.com/NMajze9vtO — ICC (@ICC) June 14, 2026

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारताने या हायव्होटेज सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने धडाकेबाज सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १७० धावा उभारल्या. सलामीवीर स्मृती मंधानाने ४४ चेंडूंमध्ये ६८ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. या अर्धशतकासह ती महिला टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांचे योगदान दिले, तर रिचा घोषने अवघ्या १७ चेंडूंमध्ये ३४ धावांची स्फोटक खेळी करून संघाला मोठी धावसंख्या मिळवून दिली. महिला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

पाकिस्तानच्या डावात मुनीबा अलीने ४१ धावांची झुंज दिली. मात्र दीप्ती शर्माच्या फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाज टिकू शकले नाहीत. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. दीप्ती शर्माने तिच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने हा सामना ६४ धावांनी जिंकला. भारत आपला पुढील सामना १७ जून रोजी हेडिंग्ले येथे नेदरलँड्सविरुद्ध खेळेल. पाकिस्तानचा सामना एडजबॅस्टन येथे दक्षिण आफ्रिकेशी होईल.

क्रीजवर गोंधळानंतर Rohit Sharma रनआउट; हिटमॅन भडकला? मैदानात नेमकं काय घडलं, गिलचा खुलासा

Web Title: India vs pakistan women t20 world cup 2026 record crowd edgbaston india win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS PAK
  • IND vs PAK Women

संबंधित बातम्या

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
1

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.