फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना : भारताचा संघ आज श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दुसरा सामान आज रंगणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांमध्ये टीम इंडिया भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारताचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताचा संघाने कालचा सामना खेळला. भारताच्या संघाने हा सामना ४७ धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. आज संध्याकाळी दुसरा सामना रंगणार आहे. टीम इंडियाच्या या श्रीलंका दौऱ्यामध्ये तीन T२० सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये T२० संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माचं कर्णधार असणार आहे.
भारताच्या श्रीलंका मोहिमेला कालपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारून २१३धावांचे लक्ष उभे केले होते. यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ चेंडूंमध्ये ५८ धावा करून संघासाठी महत्वाची खेळी खेळली. त्याचबरोबर भारताचा दमदार फलंदाज रिषभ पंतचे १ धावेने अर्धशतक हुकले. त्याने ३३ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर संघासाठी रियान परागने ३ विकेट्स घेतले. तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले आहेत.
श्रीलंकेच्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर पाठुम निस्संका याने दमदार फलंदाजी केली. त्याने ४८ चेंडूंमध्ये ७९ धावा केल्या. कुसल मेंडिसने सुद्धा २७ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. परंतु हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर संघाची फलंदाजी डगमगली आणि भारतीय क्रिकेट संघाला त्याचा मोठा फायदा झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर पाठीरानाने संघासाठी ४ विकेट्स घेतले.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. हा सामना तुम्ही सोनी लिव्ह अँपवर पाहू शकता .