
आज कसोटी सामन्याचा चौथा दिवस आहे. दुसऱ्या डावात फोर वाहकवण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेचा स्टार फलंदाज असलेला दिनेश चांदीमल जखमी झाला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मान आणि खांद्याला दुखापत झाल्याने त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. चांदीमलला दुखापत झाल्याने त्याच्या जागी पसिंदू सोरियाबंदारा कंकशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळण्याची संधी मिळाली.
IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…
पसिंदू सोरियाबंदारा मैदानात येताच त्याने चांगली फिल्डिंग करत आपली चुणूक दाखवली. मात्र भारताने श्रीलंकेसमोर ३७२ रन्सचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे श्रीलंकेकडून पसिंदू सोरियाबंदारा फलंदाजी करण्यासाठी आला. मात्र भारताचा फिरकीपटू असलेल्या मानव सुथारने पहिल्याच बॉलवर त्याला आउट केले. त्यामुळे त्याचे इंटरनॅशनल डेब्यू त्याच्यासाठी दू:खद ठरले आहे. कंकशन सब्स्टिट्यूट म्हणून डेब्यू केले आणि फलंदाजीत देखील शून्यावर आउट झाल्याने त्याने केलेले डेब्यू हे एखादे वाईट स्वप्न होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…