भारत विरूद्ध श्रीलंका
भारतीय संघ चाहत्यांना नाराज करत नाही. वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर सूर्यकुमारच्या हाती भारतीय टीमची धुरा सोपविण्यात आली. गौतम गंभीर कोच म्हणून निवडून आल्यावर आता श्रीलंकेमध्ये काय कमाल दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. तर श्रीलंकेसह तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्याचा निकाल पहिल्या 40 षटकात लागला नाही.
दोन्ही संघांचे गुण बरोबरीत राहिले. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारतीय संघाने विजय खेचून आणला. भारतीय फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी करत संघाला सामन्यात परत आणले. भारताने मालिका 3-0 ने जिंकली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळाची सुरुवात मालिका विजयाने झाली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
शेवटच्या 5 षटकात सात विकेट
138 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ एका क्षणी सामना जिंकत होता अशीच स्थिती होती. 15 षटकांनंतर श्रीलंकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. 16 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने कुसल मेंडिसची विकेट घेतली. मेंडिस 41 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. यानंतर भारतीय फिरकीपटू सातत्याने विकेट घेत राहिले. लंकन संघावर दबाव कायम होता. 17व्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सुंदरने हसरंगा आणि असलंका यांना बाद केले. श्रीलंकेला तीन षटकांत 21 धावांची गरज होती.
हेदेखील वाचा – Paris Olympic 2024: 7 महिन्याची गरोदर असताना ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी! जग करतंय सलाम
शेवटच्या दोन षटकात जीव टांगणीला
सुपरओव्हरचा थरार
खलील अहमद 18 वे ओव्हर टाकायला आला. या षटकात खलीलने 12 धावा दिल्या. श्रीलंकेला दोन षटकात 9 धावांची गरज होती. रिंकू सिंग 19 वे ओव्हर टाकायला आला. दुसऱ्याच चेंडूवर रिंकूने आश्चर्यकारक कामगिरी केली. रिंकूने कुसल परेराला झेलबाद केले. रिंकूनेही ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रमेश मेंडिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकात तीन धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले.
श्रीलंकेला शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर कामिंदू मेंडिसची विकेट पडली. तिक्षना तिसऱ्या चेंडूवर बाद झाली. श्रीलंकेच्या संघाला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर तीन धावा काढायच्या होत्या. फक्त दोन धावा झाल्या. सामना बरोबरीत सुटला.
लंकेच्या सुपर ओव्हरमध्ये 2 धावा
सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदर भारतासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला. सुंदरने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर परेरा आणि निसांकाच्या विकेट घेत श्रीलंकेचा डाव संपवला. सुपर ओव्हरमध्ये लंकेला केवळ 2 धावा करता आल्या. शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तीन धावा केल्या. सूर्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
हेदेखील वाचा – Paris Olympic 2024: तिरंदाज भजन कौरचे शानदार प्रदर्शन, राऊंड ऑफ 16 मध्ये केला प्रवेश
रिंकू सिंगची कमाल
या सामन्यात भारताच्या फिरकीपटूंची सर्वाधिक चर्चा झाली. वॉशिंग्टन सुंदरने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. लेगस्पिनर रवी बिश्नोईने 4 षटकात 38 धावा देत 2 बळी घेतले. रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी एक ओव्हर टाकली. दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सामन्यातील अष्टपैलू कामगिरीबद्दल वॉशिंग्टन सुंदरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यमालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.
अशी होती सुपरओव्हर
When in need, call @rinkusingh235 🤙
Game-changing over 🤩🔥#SonySportsNetwork #SLvIND pic.twitter.com/aGjQNXamFp
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024