ईशांत शर्माचा 38 वा वाढदिवस (फोटो- ians)
दिग्गज वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आज आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटर्स, त्याचे सहकारी त्याला प्रेमाने लंबू असे म्हणतात असे समोर आले आहे. दिल्लीच्या मैदानातून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या इशांतने २००७ मध्ये भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केले. मात्र 2007 मधल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला एक नवीन दिशा मिळाली. त्याच्या कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले.
2007 मध्ये 19 वर्षीय ईशांत शर्माने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगला भेदक गोलंदाजी करत त्याला आउट केले होते. त्यावेळी ईशांत शर्माची क्रिकेट जगटाने दखल घेतली होती. त्यानंतर लॉर्ड्सवर २०१४ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ७ बळी टिपत त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मार्गदर्शक श्रवण कुमार यांच्या छत्रछायेखाली इशांतने दिल्लीतील अत्यंत स्पर्धात्मक अशा क्लब क्रिकेटच्या मैदानात कठोर परिश्रम केले. त्यानंतर दिल्लीच्या रणजी संघात स्थान मिळवत त्याने आपल्या भेदक माराने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा इशांत हा कपिल देव यांच्यानंतरचा केवळ दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज आहे. दुखापती आणि फॉर्ममधील चढ-उतार यांचा सामना करत इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ३११ विकेट्स घेतल्या आहेत. सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीतील एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इशांतचा दिल्लीच्या गल्लीबोळांतून सुरू झालेला हा प्रवास भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण पानांमध्ये नोंदवला गेला आहे.
टीम इंडियामध्ये सत्र सुरु! हे पाच खेळाडू कधीही करू शकतात निवृत्तीची घोषणा
चिकाटी, अफाट मेहनत आणि क्रिकेटविषयीची निष्ठा यांच्या बळावर इशांतने भारतीय वेगवान गोलंदाजीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. इशांत शर्माला लहानपणापासूनच क्रिकेटचा एवढा प्रचंड ध्यास होता की, या खेळात स्वतःला पूर्णपणे झोकून देण्यासाठी त्याने १० वीच्या शिक्षणानंतर रेग्युलर शाळा सोडण्याचा एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. शिक्षणाचा त्याग करून दिवस-रात्र मैदानावर घाम गाळण्याचा त्याचा हा निर्णय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.






