जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Eng 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. आजपासून(१० जुलै) तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतला आहे. त्यामुळे भारतीय संघ अधिक बळकट वाटत आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहला इतिहास रचण्याची मोठी संधी असणार आहे. जर जसप्रीत बुमराह या कसोटी सामन्यात ७ बळी घेण्यास यशस्वी ठरला तर तो इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनणार आहे.
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बुमराह मैदानावर उतरला आहे. या सामन्यात बुमराहला लय परत मिळवावीलागणार आहे आणि इंग्लंडच्या फलंदाजांना शक्य तितक्या लवकर माघारी पा पॅव्हेलियनमध्ये पाठवावे लागणार आहे. या सामन्यात ७ बळी घेताच बुमराह इशांतचा विक्रम देखील मोडणार आहे. इशांत शर्माने इंग्लंडमध्ये भारताकडून ४८ बळी टिपले आहेत.
हेही वाचा : Wimbledon 2025 : नोवाक जोकोविचने रचला इतिहास! दिग्गज फेडररचा विक्रम उध्वस्त, सेमीफायनल मारली धडक
इशांत शर्माने २०२१ मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४८ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या नऊ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत ४२ बळी टिपले आहेत.
इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये इशांतनंतर कपिल देवचे नाव येते. कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध १३ कसोटी सामने खेळले असून ज्यामध्ये त्यांनी ४३ बळी मिळवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक म्हणजे ४०० पेक्षा जास्त बळी घेणारा कपिल देव हा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे.
८ बळी घेताच बुमराह रुचणार इतिहास
जर बुमराहने लॉर्ड्स कसोटीत ८ बळी घेण्यात यश मिळवले तर तो इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध ५० कसोटी बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरणार आहे. इंग्लंडमध्ये एका तीन वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम बुमराहने केला आहे. जसप्रीत बुमराहने चालू पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी खेळली आणि पहिल्या डावात २४.४ षटकांत ८३ धावा देत पाच बळी घेतले आहेत. कामाच्या ताणामुळे तो एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता.
इंग्लंडमधील भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर जमा आहे. दोन दशकांहून अधिक काळ खेळलेल्या आपल्या कसोटी कारकिर्दीत अँडरसनने आपल्या घरच्या मैदानावर भारताविरुद्ध २२ कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये १०५ बळी घेतले आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘युवा संघाची इंग्लंडमध्ये जिंकण्याची क्षमता..’, ‘या’ माजी दिग्गज खेळाडूकडून गिल सेनेचे कौतुक