Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 02, 2025 | 09:14 PM
IND vs SA: Will the Indian team be announced for the T20 series? These three star players will get another chance

IND vs SA: Will the Indian team be announced for the T20 series? These three star players will get another chance

Follow Us
Close
Follow Us:

India vs South Africa T20 series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची ही टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करेल आणि कोणते खेळाडू संघात परतणार आहेत? याबद्दल महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ कधी जाहीर होणार?

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. एका वृत्तांनुसार, बीसीसीआय ३ डिसेंबर रोजी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची टी-२० मालिका खेळली असून या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला होता. त्या मालिकेत अनेक तरुण खेळाडूंच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने मालिका खिशात घातली. आता काही वरिष्ठ आणि नियमित खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सरफराज खानची स्फोटक फलंदाजी! गोलंदाजांवर चढवला हल्लाबोल; निवडकर्त्यांना दिला इशारा

हार्दिक पंड्याचे पुनरागमन निश्चित

२०२५ च्या आशिया कप दरम्यान दुखापतीमुळे हार्दिक पंड्या भारतीय संघाबाहेर आहे. तथापि  बातमी समोर येत आहे की हार्दिकची तंदुरुस्तीमध्ये झपाट्याने सुधार झाला आहे. तसेच तो आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत देखील आहे. त्यामुळे आता  निवड समिती त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या पुनरागमनामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाला अधिक बळकटी मिळेल.

शुभमन गिलचे पुनरागमन होईल का?

शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मानेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याला विश्रांती देण्यात आली होती. पहिल्या कसोटीनंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता तो टी-२० मालिकेसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.  गिल टी-२० स्वरूपात सातत्य आणि जलद धावगती दोन्ही प्राप्त करून देऊ शकतो. त्यामुळे संघात त्याची उपस्थिती  संघाच्या टॉप ऑर्डरसाठी महत्त्वाची असणार आहे.

‘या’ स्टार खेळाडूचे परतणे शक्य

टी-२० स्वरूपात भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड बराच काळ उलटून गेला भारतीय संघाचा भाग नाही. त्याने  २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची टी-२० मालिका खेळली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. त्यामुळे, निवडकर्ते त्याला बॅकअप ओपनर आणि लवचिक फलंदाज म्हणून पुन्हा संधी देण्याचा विचार करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त

 

Web Title: Indian team announcement for t20 series against south africa likely on december 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Ind Vs Sa
  • Shubhman Gill
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी
1

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

इंग्लंडच्या T20 World Cup 2026 तयारीत मोठा अडथळा! भारत सरकारकडून ‘या’ दोन पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंना अद्याप व्हिसा नाही 
2

इंग्लंडच्या T20 World Cup 2026 तयारीत मोठा अडथळा! भारत सरकारकडून ‘या’ दोन पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंना अद्याप व्हिसा नाही 

IND vs NZ 2nd ODI : ‘न्यूझीलंडचा विजय पाहून….’ भारताचे माजी दिग्गज फलंदाज गावस्कर यांनी केले आश्चर्य व्यक्त 
3

IND vs NZ 2nd ODI : ‘न्यूझीलंडचा विजय पाहून….’ भारताचे माजी दिग्गज फलंदाज गावस्कर यांनी केले आश्चर्य व्यक्त 

IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 
4

IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.