Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूतानमध्ये तिरंगा फडकला! पुण्याच्या धनराज राऊतची आशियाई आट्या-पाट्या स्पर्धेत ‘सुवर्ण’ झेप!

भूतान आट्या-पाट्या फेडरेशनच्या वतीने ७ ते १० जून २०२६ या कालावधीत धामदारा, फुंटशोलिंग येथे तिसऱ्या आशियाई वरिष्ठ आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 02:39 PM
भूतानमध्ये तिरंगा फडकला! पुण्याच्या धनराज राऊतची आशियाई आट्या-पाट्या स्पर्धेत ‘सुवर्ण’ झेप!
Follow Us
Follow Us:
  • धनराज राऊतची आशियाई आट्या-पाट्या स्पर्धेत सुवर्ण झेप
  • आशियाई वरिष्ठ आट्या-पाट्या स्पर्धेत भारतीय संघ प्रथम
  • धनराजच्या या यशामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण 
सुनयना सोनवणे /पुणे: भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई वरिष्ठ आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावत देशाचा झेंडा उंचावला. या विजयी भारतीय संघात पुण्याचा २२ वर्षीय खेळाडू धनराज गणेश राऊत याचा समावेश होता. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय संघाच्या विजयात मोलाची भर पडली.

भूतान आट्या-पाट्या फेडरेशनच्या वतीने ७ ते १० जून २०२६ या कालावधीत धामदारा, फुंटशोलिंग येथे तिसऱ्या आशियाई वरिष्ठ आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आशियातील विविध देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.

धनराज राऊत हा ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या क्रीडाकुलचा माजी विद्यार्थी असून सध्या इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड असून आट्या-पाट्या या पारंपरिक भारतीय खेळात त्याने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्पर्धेतील यशानंतर आता आशियाई स्तरावरही त्याने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.

धनराजच्या या यशामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध क्रीडा संघटना, प्रशिक्षक, मित्रपरिवार आणि पुणेकरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय आट्या-पाट्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात या यशाचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे.

Web Title: Indian team first place at asian senior atya patya championship held in bhutan dhanraj raut gold medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • gold medal
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

IND A vs AFG A: 2 कॅच सुटले, अंपायरकडून मिळाले जीवनदान तरीही 28 बॉल्समध्येच Vaibhav Sooryavanshi चा खेळ आटोपला
1

IND A vs AFG A: 2 कॅच सुटले, अंपायरकडून मिळाले जीवनदान तरीही 28 बॉल्समध्येच Vaibhav Sooryavanshi चा खेळ आटोपला

GDP Growth Rate: देशाचा खरा विकासदर ७.७ टक्के नव्हे, तर केवळ २.७ टक्केच ! माजी अर्थमंत्र्यांचा खळबळजनक दावा
2

GDP Growth Rate: देशाचा खरा विकासदर ७.७ टक्के नव्हे, तर केवळ २.७ टक्केच ! माजी अर्थमंत्र्यांचा खळबळजनक दावा

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू;  रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
3

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

IND A vs SL A Controversy: वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड, डिकवेलाही अडचणीत
4

IND A vs SL A Controversy: वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड, डिकवेलाही अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.