हाँगकाँगचा (Hongkong)१५५ धावांनी दणदणीत पराभव केल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) आता सुपर-४ साठी पात्र ठरला आहे. त्यामुळे भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान सोबत रविवारी पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. सुपर ४ मध्ये खेळवला जाणारा हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा असून सामना जिंकल्यास आशिया कपच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा कर्णधार रोहित (Rohit Sharma) शर्मा यासाठी कोणतीही कासार सोडणार नसून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना तो बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
केएल राहुल(KL Rahul) हा त्याच्या फॉरमॅट नसल्यामुळे येत्या सामन्यात के एल राहुलला संघ बाहेरचा रास्ता दाखवला जाऊ शकतो. अथवा तसे न झाल्यास राहुल पाकिस्तानविरुद्ध कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला जाऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला संधी मिळू शकते. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला (Surykumar Yadav) चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. तर हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या स्टार खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya)पुन्हा संघात समाविष्ट केले जाऊ शकते. अष्टपैलू हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते.
कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षकाची जबाबदारी दिनेश कार्तिक देऊ शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी मिळाली. कार्तिकने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंगची निवड करू शकतो. त्याचवेळी खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या आवेश खानच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.