KKR vs RR Match Live : आज कोलकाताच्या इडन गार्डनवर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. तिने या हंगामात गुणतालिकेत सर्वात वरचे स्थान प्राप्त केले आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर केकेआर आहे. त्यामुळे या हंगामातील दोन्ही अव्वल संघ आज आमने-सामने असणार आहेत.
फलंदाजांची कुमकसुद्धा मजबूत
राजस्थानकडे चांगली गोलंदाजी आहे, त्याचबरोबर फलंदाजांची कुमकसुद्धा मजबूत आहे. तर केकेआर दमदार फलंदाजांची फळी आहे, तर गोलंदाजसुद्धा मजबूत आहेत. राजस्थानकडून आवेश खानने फिल्प सॉल्टच्या रूपाने पहिली विकेट घेतली आहे. सॉल्टला कॉट अॅंड बॉल्ड करीत आऊट केले.
राजस्थान संघ : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c&wk), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
कोलकाता नाईट रायडर्स : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर (क), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा