IPL 2024 KKR vs SRH Final Match Live Score : आयपीएलचा हंगामातील अखेरचा सामना चेपॉक स्टेडियमवर अगदी काही वेळातच सुरू होत आहे. या वेळेचा हंगाम वेगळाच राहिला, कारण या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला, तर दुसरीकडे जे संघ मागील हंगामात गुणतक्त्यात शेवटी होते, ते सर्वात वर आहेत.
कोलकाता आयपीएल चॅम्पियन
𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 𝗢𝗙 #𝗧𝗔𝗧𝗔𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 😍🏆
The 𝗞𝗢𝗟𝗞𝗔𝗧𝗔 𝗞𝗡𝗜𝗚𝗛𝗧 𝗥𝗜𝗗𝗘𝗥𝗦! 💜#KKRvSRH | #Final | #TheFinalCall | @KKRiders pic.twitter.com/iEfmGOrHVp
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
2 क्वार्टर फायनलमध्ये SRH ने हरवले होते RR ला
आज कोलकाता विरुद्ध हैद्राबाद यांच्यात सामना रंगणार आहे. कोलकाताने हैद्राबादला धूळ चारीत फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर दुसरीकडे सनरायझर्सने दमदार कमबॅक करीत राजस्थानचा पराभव केला, अन् फायनलचे तिकीट काढले. अवघ्या 176 धावांचे लक्ष्यसुद्धा राजस्थानला गाठता आले नव्हते.
गुरबाज आणि व्यंकटेश अय्यरची तुफानी भागीदारी
Ferocious striking from these two! 💥💥
Kolkata Knight Riders are cruising in the chase 💜
Follow the Match ▶️ https://t.co/lCK6AJBFRB#TATAIPL | #KKRvSRH | #Final | #TheFinalCall pic.twitter.com/I3sVchNacc
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
दोन्ही संघांची या हंगामातील कामगिरी
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, एसआरएचने या हंगामात चमकदार कामगिरी केली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी 277 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आरसीबीविरुद्ध 287 धावा करत त्याचाच विक्रम मोडला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन सारखे प्रमुख खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. केकेआरने हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीविरुद्ध सलग तीन विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सुनील नारायण आणि फिल सॉल्टने संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. त्याचबरोबर गोलंदाजांनीही सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत केकेआर संतुलित संघ दिसला आहे.
चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी अहवाल
अंतिम सामान्यांच्या खेळपट्टीचा विचार केला तर चेपॉकची खेळपट्टी आळशी आहे. त्यामुळे ही खेळपट्टी स्पिनर आणि गोलंदाजांना अनुकूल ठरते त्याचबरोबर गोलंदाजांना वेग बदलायला मदत होते. त्यामुळे अशा खेळपट्टीसाठी उच्च-स्कोअरिंग सामने पाहणे असामान्य आहे. नाणेफेक जिंकणारे संघ सामान्यत: प्रथम क्षेत्ररक्षण निवडतात, नंतर लक्ष्याचा पाठलाग करण्याचे लक्ष्य ठेवतात. चेपॉकच्या मैदानावर 24 तासांपूर्वी सामना झाला आहे. त्यामुळे दवाचा प्रभाव कमी आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असले तरी, फिरकीपटूंना खेळपट्टीकडून पुरेसा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे फलंदाजांना संयमाने परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक होते.
कोलकाता नाईट राइडर्सची संभाव्य प्लेइंग 11
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग 11
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन