Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘थोडे जबाबदार आणि समजूतदार व्हा..’, ‘त्या’  २७ कोटींच्या पोस्टवर Rishabh Pant भडकला, चाहत्यांना सुनावलं.. 

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ६४ सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याची कामगिरी खूपच सुमार अशी राहिली आहे. तो सोशल मीडियावर ट्रोल होता आहे. आता त्याने एका पोस्टला उत्तर दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 23, 2025 | 08:52 AM
IPL 2025: 'Be a little responsible and understanding..', Rishabh Pant got angry over 'that' 27 crore post, told fans..

IPL 2025: 'Be a little responsible and understanding..', Rishabh Pant got angry over 'that' 27 crore post, told fans..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025  : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ६४ सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगामा शेवटच्या टप्प्यात आला आहे. या संपूर्ण स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खूप  चर्चेत राहिला. त्याचे कारण म्हणजे त्याचा फॉर्म. तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. संघाचा कर्णधार ऋषभ पंतची कामगिरी खूप वाईट झाली आहे. यावर्षी ऋषभ पंतचे कर्णधारपद देखील खराब राहिले आहे. पंतची  फलंदाजी ही या स्पर्धेत चिंतेची बाब ठरली आहे. अशा परिस्थितीत  सोशल मीडियावर चाहते पंतला खूप ट्रोल करताना दिसत आहे.

आता या सर्व प्रकारावर एलएसजीच्या कर्णधाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतने या प्रकाराला बनावट बातम्यांचा अजेंडा असे म्हटले आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात एलएसजीने ऋषभ पंतला २७ कोटींच्या मोठ्या बोलीने खरेदी केले होते.  त्यानंतर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

हेही वाचा : Neeraj Chopra : दोहामध्ये ९० मीटरचा अडथळा पार करणाऱ्या नीरज चोप्राचा असेल मोठ्या फेकीचा प्रयत्न; वेबर चोरझोचे असेल आव्हान

पंतची प्रतिक्रिया नेमकी काय?

क्रिकेटप्रेमी आणि फ्रँचायझीला या अपेक्षा होती की ऋषभ पंत चालू हंगामात आपल्या बॅटने चांगली कामगिरी करेल. पण असे प्रत्यक्षात मात्र काही घडले नाही. लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळताना त्याच्या बॅटमधून धावाच आल्या नाहीत. त्यानंतर एका पत्रकाराने सोशल मीडियावर लिहिले की, त्याला पुढील वर्षी लखनौ सुपर जायंट्समधून सोडण्यात येणार, कारण २७ कोटी रुपयांची रक्कम खूप जास्त आहे. या पोस्टला उत्तर देताना कर्णधार पंतने आपली प्रतिक्रिया दिली.

I understand fake News gives more traction To content but let’s not built everything around it . Little sense and credible news will help more rather making fake news with agenda . Thanks have a good day . Let’s be responsible and sensible what we put out on social media 🇮🇳🙏🏻 — Rishabh Pant (@RishabhPant17) May 22, 2025

‘त्या’ पोस्टवर ऋषभ पंत भडकला

पत्रकाराने शेअर केलेल्या एका पोस्टवर ऋषभ पंत संतपलेला दिसून आला. त्याने उत्तर दिले की, “मी सहमत आहे की बनावट बातम्यांमुळे मजकुराची पोहोच अधिक असते, परंतु ती सर्वस्व मानली जाऊ नये. अजेंडा असलेल्या बनावट बातम्यांऐवजी, थोडीशी समजूतदार आणि योग्य बातमी चांगली असेल. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ जावो. सोशल मीडियावर तुम्ही जे काही पोस्ट कराल त्याबाबत थोडे जबाबदार आणि समजूतदार व्हा.”

ऋषभ पंतची आयपीएल २०२५ मधील कामगिरी

लखनौ सुपर जायंट्सने या हंगामात एकूण १३ सामने खेळले आहेत. आता त्यांना आणखी एक सामना खेळायचा आहे. पण त्याआधीच संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. उर्वरित एक सामना आता केवळ संघासाठी फक्त एक औपचारिकता असणार आहे.  जर आपण कर्णधार ऋषभ पंतबद्दल सांगायचे झाले तर त्याने या हंगामात १२ डावांमध्ये फक्त १५१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक अर्धशतकाचा देखील समावेश आहे.

हेही वाचा : PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप…

२०२५ च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतची सरासरी १२.२७ इतकी आहे. आयपीएलमधील एका हंगामात कोणत्याही कर्णधाराची ही सरासरी दुसरी सर्वात वाईट सरासरी ठरली आहे. २०२१ च्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनची सरासरी ११.०८ इतकी होती आणि दुसऱ्या नंबरवर ऋषभ पंतचे नाव घ्यावे लागते.

Web Title: Ipl 2025 be a little responsible rishabh pant gets angry over that 27 crore post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • bcci
  • LSG vs GT
  • Rishabh Pant
  • Sanjiv Goenka

संबंधित बातम्या

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
1

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
2

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित
3

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.