पीएसएल 2025(फोटो-सोशल मीडिया)
PSL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत गेल्याने त्याचा परिणाम दोन्ही देशांमधील खेळांवर झालेला दिसून आला आहे. बीसीसीआयकडून आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. तर पीसीबीनेही पीएसएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले होते. तथापि, यानंतर आयपीएल स्पर्धा भारतात सुरू करण्यात आली आहे, तसेच काही दिवसांनी पाकिस्तानमध्ये पीसीएल सुरू होणार आहे.
तथापि, पीसीएल सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला आहे. आता पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने ‘हॉक आय’ आणि ‘डीआरएस’ तंत्रज्ञानाशिवाय खेळवण्यात येणार आहे. कारण, त्यातील बहुतेक तंत्रज्ञ भारतातील असल्याने सद्याची परिस्थिती बघता ते पाकिस्तनला परतण्याची शक्यता कमी आहे.
कहर तर एका अर्थाने, असेही म्हणता येईल की पाकिस्तानला आता भारताशी पंगा घेण्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. आता ही स्पर्धा फक्त लाईव्ह बघता येणार आहे. असे दिसून येत आहे की, आता पाकिस्तानची सर्वात मोठी लीग असलेली पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा राहिली नसून एक गल्ली क्रिकेट स्पर्धा तेवढी राहिली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटक मारले गेले. त्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर पीएसएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. पीसीबीकडून उर्वरित पीएसएल सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, अमिराती क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. यानंतर, पीएसएलचा १० वा टप्पा पूर्ण करण्यात पीसीबीसमोर अनेक अडचणी आहेत.
हेही वाचा : GT vs LSG : गुजरातचे पहिले स्थान अडचणी! GT ला LSG ने 33 धावांनी केले पराभूत
एका फ्रँचायझीच्या विश्वसनीय सूत्रानुसार, ‘हॉक आय’ आणि ‘डीआरएस’ तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन आणि संचालन करणारी टीम पाकिस्तानला अद्याप परतलेली नाही. सूत्रांनी सांगितले की याचा अर्थ असा की पीएसएलचे उर्वरित काही सामने आता कोणत्याही डीआरएसशिवाय खेळवले जातील. जो बोर्ड आणि संघांसाठी एक मोठा धक्काच असणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर काल झालेल्या ६४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात लखनऊच्या संघाने गुजरातला त्याच्या घरच्या मैदानावर ३३ धावांनी पराभुत केले. गुजरातच्या संघासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स २०२ धावांपर्यंतच पोहचू शकले.