Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
जिओ त्यांच्या यूजर्सना 3,999 आणि 3,599 रुपये असे दोन अॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. 3,999 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G + रोज 2.5GB डेटा, रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबत फॅनकोड, जियोहॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन आणि 18 महिन्यांचे गूगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. 3,599 वाल्या प्लॅनमध्ये फॅनकोड सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त इतर सर्व फायदे मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओप्रमाणेच एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 3,999 आणि 3,599 असे दोन अॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. कंपनीच्या 3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G + रोज 2.5GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यामध्ये एका वर्षाचे जियोहॉटस्टार आणि परप्लेक्सिटी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. तर 3599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यामध्ये केवळ परप्लेक्सिटी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.
Vi च्या अॅन्युअल रिचार्ज प्लॅनची किंमत 3599 आणि 3799 रुपये आहे. 3599 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसाची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनच्या एडिशनल बेनिफिटमध्ये रात्री 12 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओवर आणि प्रत्येक महिन्याला 2GB बॅकअप डेटा मिळतो. जर आपण 3799 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोललो तर, 3599 रुपयांच्या सर्व फायद्यांसोबत, यामध्ये एका वर्षासाठी प्राइम लाइटचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.
Ans: ज्या प्लॅनची वैधता 365 दिवस, 730 दिवस किंवा 2027 पर्यंत असते, त्यांना लाँग-टर्म रिचार्ज प्लॅन म्हणतात.
Ans: होय. BSNL, Airtel, Jio, Vi कडे 1–2 वर्षांची वैधता असलेले प्लॅन उपलब्ध आहेत
Ans: काही निवडक प्लॅनमध्ये 5G सपोर्ट मिळतो, पण तो नेटवर्क आणि कंपनीवर अवलंबून असतो.






