फोटो सौजन्य - Chennai Super Kings
एमएस धोनी : आयपीएल पुन्हा सुरू झाली आहे पण या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने काही विशेष कामगिरी केली नाही. चेन्नई सुपर किंग्जचे सुरुवातीला कर्णधार पद हे ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आले होते. त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला त्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. सध्या चेन्नई सुपर किंग्स कर्णधारपद हे एमएस धोनीकडे सोपवण्यात आले आहे. सध्या एक ट्रेंड एक्सवर म्हणजेच आधीचे ट्विटरवर व्हायरल होत आहे. हे एमएस धोनीच्या निगडित आहे त्यामुळे नक्की का त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये सीएसकेसाठी अद्भुत कामगिरी करत आहे. तो या संघाचे नेतृत्वही करत आहे. तथापि, प्लेऑफच्या शर्यतीतून सीएसकेचा प्रवास संपला आहे. आयपीएल २०२५ मध्ये १८ मे रोजी आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यातील सामना खेळवण्यात येणार होता. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. यादरम्यान, स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह शोमध्ये हरभजन सिंगने एमएस धोनीच्या चाहत्यांचे खूप कौतुक केले.
RR vs PBKS : हेटमायरचा तो विकेट संघाला पडला महागात! पंजाबने राजस्थानला 10 धावांना केलं पराभूत
भज्जी म्हणाला की, जर कोणत्याही खेळाडूचे खरे चाहते असतील तर ते फक्त धोनीच आहेत. बाकी सर्व फेक आहेत. आता हरभजनचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर, विराट कोहलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एमएस धोनीला ट्रोल करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर विराट कोहली फॅन्स नावाच्या अनेक वापरकर्त्यांनी एमएस धोनीबद्दल वादग्रस्त गोष्टी लिहिल्या.
सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचे चाहते आणि एम एस धोनीची चाहते हे वाद घालत आहेत. खरं सांगायचं झालं तर एमएस धोनी आणि विराट कोहली हे खूप चांगले मित्र आहेत. बऱ्याचदा विराट कोहली हा एमएस धोनी बद्दल त्यांनी दोघांनी शेअर केलेले आठवणी मुलाखतीमध्ये सांगत असतो त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या स्टार स्पोर्ट्स च्या मुलाखतीमध्ये एम एस धोनीने विराट कोहली हा माझा ज्युनिअर नसून तर माझा एक मित्र आहे असे त्यांनी सांगितले होते. सध्या सोशल मीडियावर ट्रॉलिंगचा हा वाद वाढतच चालला आहे.
This is the reason I hate every fanclub. These fanclubs have destroyed cricket in India. Toxic mofos.
SHAME ON DESHDROHI DHONI#NationalShameKohli pic.twitter.com/6wAi8b7b0N
— Incognito (@Incognito_qfs) May 18, 2025
This is exactly why I’ve lost respect for fan clubs. Their toxic behaviour has taken the spirit out of Indian cricket.
Now they’re actually trending:
SHAME ON DESHDROHI DHONI and #NationalShameKohli
Unbelievable pic.twitter.com/Ud57dHByDs— Vishal (@VishalMalvi_) May 18, 2025