फोटो सौजन्य - IndianPremierLeague
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचा अहवाल : राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर आज संघाचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध झाला. यामध्ये आजच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने कमालीची फलंदाजी करत संघाला 10 धावांनी विजय मिळवून दिला आहे. या विजयासह पंजाबचा संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर गेला आहे. आजच्या सामन्यात दुसरा डावांमध्ये श्रेयस अय्यरने संघाचे नेतृत्व केले नाही त्याच्या जागी शशांक सिंग याने संघाचे नेतृत्व केले.
आजचा सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यावर एकदा नजर टाका. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर यशस्वी जयस्वालने आजच्या सामन्यात 25 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या, यामध्ये त्याने एक षटकार आणि नऊ चौकार मारले. तर वैभव सूर्यवंशी यांनी देखील त्याच्या बॅटमधून महत्त्वाच्या धावा केल्या, त्याने 15 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या. यामध्ये चार षटकार आणि चार चौकारांचा देखील समावेश होता. दुखापतीनंतर आज संजू सॅमसंग मैदानात परतला होता पण तो आजच्या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही त्याने 16 चेंडूमध्ये वीस धावा केल्या.
Match 59. Punjab Kings Won by 10 Run(s) https://t.co/HTpvGew6ef #RRvPBKS #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
पंजाबच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर नेहाल वढेरा याने आज 70 धावांची दमदार खेळी खेळली तर दुसरीकडे शशांक सिंग याने देखील संघाला 59 धावा करून दिल्या. या दोघांचा फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने 219 धावा केल्या होत्या. आजचा सामन्यात कमालीच्या फलंदाजीमुळे पंजाबच्या संघाने विजय मिळवून गुणतालिकेची स्थिती आणखीनच मनोरंजक केली आहे. पंजाब किंग्सच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर मार्को जन्सन याने संघासाठी दोन विकेट्स घेतले. यामध्ये त्याने ध्रुव जुरेल आणि हंसरंगा या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला.
DC vs GT : दिल्लीच्या संघासमोर प्लेऑफचे आव्हान! शुभमन गीलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणार
अजमतुला उमरजाई याने देखील आज संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. त्याने आजच्या सामन्यात सिमरॉन हेटमायर आणि संजू सॅमसन यांना पवेलियनचा रस्ता दाखवला. पंजाब किंग्सच्या इम्पॅक्ट प्लेयर हरप्रीत ब्रार याने संघासाठी आज दमदार कामगिरी केली त्याने आज संघाला तीन विकेट्स मिळवून दिले आणि त्याचे हे तीन मौल्यवान विकेट संघाला विजय मिळवून दिले हे त्याचे विकेट्स पंजाब किंग्सच्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान केले आहे.