Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Jammu Kashmir Host cricket Irani Cup 2026: ४० वर्षानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये ऐतिहासिक क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर यावर्षी ऑक्टोबरमध्ये इराणी कप सामना आयोजित केला जाईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 07:37 PM
Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
Follow Us
Follow Us:
  • जम्मू-काश्मीरमध्ये ४० वर्षांनंतर रंगणार मोठा सामना
  • ऑक्टोबरमध्ये इराणी कप आयोजन
  • रेस्ट ऑफ इंडियाने जिंकली सर्वाधिक विजेतेपद
जम्मू आणि काश्मीर गेल्या चार दशकांतील सर्वात मोठ्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर यावर्षी ऑक्टोबरमध्ये इराणी कप सामना आयोजित केला जाईल. हा १९८० च्या दशकानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात मोठा क्रिकेट सामना ठरेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा सामना २०२५-२६ रणजी ट्रॉफी विजेते जम्मू आणि काश्मीर विरुद्ध उर्वरित भारत यांच्यात १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळला जाईल.

Breaking News: टेबल टेनिस फेडरेशनला मोठा झटका! क्रीडा मंत्रालयाने रद्द केली TTFI ची मान्यता; नेमकं कारण काय?

श्रीनगरमध्ये होणार ऐतिहासिक ट्रॉफीचे आयोजन?

९ सप्टेंबर १९८६ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर काश्मीरमध्ये होणारा हा सर्वात मोठा क्रिकेट सामना असेल. या स्टेडियममध्ये यापूर्वी दोन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सामन्यात, १३ ऑक्टोबर १९८३ रोजी भारताचा सामना वेस्ट इंडिजशी झाला होता, ज्यात खराब हवामानामुळे डकवर्थ-लुईस (D/L) प्रणालीनुसार वेस्ट इंडिजला विजेता घोषित करण्यात आले होते. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सने पराभव केला होता.

गेल्या वर्षी, १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान, शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात एक महत्त्वपूर्ण रणजी ट्रॉफी सामना आयोजित करण्यात आला होता. डावखुरा फिरकी गोलंदाज अष्टपैलू शम्स मुलानीने पहिल्या डावात ९१ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ४६ धावांत सात विकेट्स घेतले. या चमकदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

स्टेडियममध्ये मोठ्या सुधारणांची आवश्यकता

जम्मू-काश्मीरचे मुख्य प्रशिक्षक अजय शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान इराणी कप सामना आयोजित केला जाईल. एका सूत्राने सांगितले की, स्टेडियम या मोठ्या सामन्यासाठी तयारी करत आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने, स्टेडियममध्ये मोठ्या सुधारणांची आवश्यकता असेल. या मोठ्या सामन्याच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या गरजांविषयी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला माहिती देण्यासाठी बीसीसीआयने दोनदा श्रीनगरला एक पथक पाठवले आहे. त्यांना कॉमेंटेटर रुम, योग्य प्रक्षेपण व्यवस्था, मीडिया बॉक्स आणि तात्पुरत्या व कायमस्वरूपी अतिरिक्त प्रेक्षक गॅलरींची आवश्यकता असेल.

सध्या, स्टेडियममध्ये ५,००० प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इराणी कप २०२६ च्या स्थळाची अद्याप अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. ४१ वर्षीय फलंदाज पारस डोग्राच्या नेतृत्वाखाली, जम्मू आणि काश्मीर संघ निश्चितपणे स्विंग गोलंदाज आकिब नबी दारवर अवलंबून असेल, ज्याची नुकतीच भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. बारामुल्लाच्या या २९ वर्षीय वेगवान गोलंदाजाने २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये १२.५६ च्या सरासरीने ६० बळी घेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

रेस्ट ऑफ इंडियाने जिंकली सर्वाधिक विजेतेपद

रेस्ट ऑफ इंडियाने आतापर्यंत ३० इराणी कप विजेतेपदे पटकावली असून, त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो, ज्याने १५ विजेतेपदे जिंकली आहेत. इराणी कपचा सामना खेळल्यानंतर, जम्मू आणि काश्मीर ११ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशविरुद्ध आपल्या रणजी ट्रॉफी विजेतेपदाच्या डिफेन्ड करण्यासाठी मैदानात उतरेल. गतविजेत्यांना २०२६-२७ रणजी ट्रॉफीसाठी एलिट गट ‘अ’ मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेश, विदर्भ, बडोदा, पुदुचेरी, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोवा यांचाही समावेश आहे.

IND vs SL Test: भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर! मेंडिस-निसांका बाहेर; ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक

Web Title: Jammu kashmir to host cricket irani cup 2026 in srinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • cricket
  • Jammu and Kashmir
  • ranji trophy
  • Srinagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.