
photo - social media
मीडिया रिपोर्टनुसार, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ शनिवारी दुपारी चार्टर्ड फ्लाइटने चंदीगडहून अहमदाबादला रवाना होणार होता. मात्र पंजाब आणि उत्तर-पश्चिम भागात आलेल्या वादळी पावसामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. विमानतळ प्रशासनाने उड्डाणासाठी परवानगी न दिल्याने संघाला अनेक तास प्रतीक्षा करावी लागली.
वादळामुळे उशिरा निघाल्याने गुजरात टायटन्सचा संघ शनिवारी रात्री उशिरा अहमदाबादमध्ये पोहोचला. त्यानंतर खेळाडूंना गांधीनगरमधील हॉटेलमध्ये नेण्यात आले. अंतिम सामन्याला २४ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना प्रवासात झालेल्या या विलंबामुळे संघाच्या सराव आणि विश्रांतीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | Ahmedabad: Gujarat Titans arrive in Ahmedabad ahead of the IPL finals against Royal Challengers Bengaluru. pic.twitter.com/ToBTvzaP25 — ANI (@ANI) May 30, 2026
दुसरीकडे, क्वालिफायर-1 जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आधीच अहमदाबादमध्ये पोहोचला होता. आरसीबीने अंतिम सामन्यापूर्वी दोन सराव सत्रेही पूर्ण केली आहेत. कर्णधार रजत पाटीदारनेही लवकर पोहोचल्यामुळे संघाला विश्रांती आणि तयारीसाठी फायदा झाल्याचे मान्य केले.
प्रवासात अडचणी आल्या असल्या तरी गुजरात टायटन्सचा आत्मविश्वास कायम आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. शुभमन गिलनेही दबावापेक्षा तयारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट केले आहे.