Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: शुभमन गिलच्या फिटनेसने वाढवली चिंता; संघात होणार मोठे बदल? पाहा पिच रिपोर्ट अन् संभाव्य Playing 11 एका क्लिकवर

IND VS ENG 2nd ODI Probable Playing 11: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 16, 2026 | 02:23 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • शुभमन गिलच्या फिटनेसने वाढवली चिंता
  • प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल?
  • भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने अखेर विजयाची चव चाखली. भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका गमावली. परंतु, आता संघाकडे एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी आहे. आजचा दुसरा वनडे सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ३० वाजता सुरु होईल. त्याआधी ५ वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात उतरतील. दुसरा वनडे सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंड देखील शर्यतीत टिकून राहण्यासाठी मैदानात उतरतील. परंतु, कर्णधार शुभमन गिललाही पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळे टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये काही बदल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या या सामन्यात कशी असेल कार्डिफची खेळपट्टी अन् संभाव प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

कार्डिफमधील सोफिया गार्डन्सची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर मानली जाते. सामना जसजसा पुढे जातो, तसतशी ती साधारणपणे धीम्या गतीच्या गोलंदाजांना आणि फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरते. पण फलंदाजांनाही धावा करण्याची चांगली संधी मिळते. हा दिवस-रात्र सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी १:०० वाजता आणि भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता सुरू होणार असल्याने, दिवसभरात बदलणाऱ्या हवामानाचा खेळपट्टीवर लक्षणीय परिणाम होईल.

कार्डिफ हवामान अंदाज

कार्डिफ येथे दिवसभरात पावसाचा कोणताही अंदाज नाही. सामन्यादरम्यान तापमान २४°C ते २८°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि खेळ संपेपर्यंत ते सुमारे २२°C पर्यंत खाली येईल. हलके वारे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला काही प्रमाणात मदत करू शकतात, परंतु एकूणच परिस्थिती फलंदाजांच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे.

गिलची दुखापत किती गंभीर?

बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बारताने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात गिलने ८० धावा केल्या, पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे तो लवकर बरे होण्याची अपेक्षा आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गिलच्या तंदुरुस्तीबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. त्यामुळे, गिल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळेल की नाही हे सामनादरम्यानच स्पष्ट होईल.

रोहित- विराटकडून अपेक्षा

भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाले. त्यामुले दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून मोट्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच, गेल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि वॉश्गिंटन सुंदर यांनी दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यास मदत केले.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11:

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

ICC चा गेमचेंजर निर्णय! 2027 वनडे वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला; ‘सुपर 7’ मुळे प्रत्येक सामना ठरणार निर्णायक

Web Title: Ind vs eng 2nd odi shubman gill fitness playing 11 pitch report cardiff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • playing 11
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
1

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल
2

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.