फोटो सौजन्य - सोशल मिडिया
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे माजी मालक विजय मल्ल्या यांनी संघाची १६,५०० कोटी रुपयांना विक्री झाल्याबद्दल नवीन मालकांचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, २००८ मध्ये जेव्हा त्यांनी ४५० कोटी रुपयांना संघ विकत घेतला होता, तेव्हा लोक त्यांच्यावर हसले होते. आता आपली गुंतवणूक इतकी वाढलेली पाहून मल्ल्या आनंदी आहेत. मल्ल्या म्हणाले की, आरसीबी नेहमीच त्यांच्या रक्तात राहील आणि यावेळी त्यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला.
मात्र, नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टची खिल्ली उडवली आणि त्यांना कर्ज फेडण्यास सांगितले. एका युझरने लिहिले की, मल्ल्या बँकेच्या सुट्टीची वाट पाहत होते. विजय मल्ल्या यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले, “मी आरसीबीच्या नवीन मालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. सर्वात मौल्यवान आयपीएल फ्रँचायझी मिळवल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. जेव्हा मी २००८ मध्ये ४५० कोटी रुपयांना ही फ्रँचायझी विकत घेतली, तेव्हा बहुतेक लोक माझ्यावर हसले आणि माझ्या गुंतवणुकीवर ‘केवळ देखाव्यासाठी केलेला प्रकल्प’ म्हणून टीका केली.”
संजू सॅमसन, रुतुराज गायकवाड की आयुष म्हात्रे… CSK ची सलामीची जोडी कोणती असणार? कर्णधाराने केले उघड
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ब्रँड उभा करणे हे माझे सर्वात मोठे ध्येय होते आणि म्हणूनच मी फ्रँचायझीचे नाव आरसीबी ठेवले. माझी ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक १६,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढलेली पाहून मला खूप आनंद झाला आहे. आरसीबी नेहमीच माझ्या रक्तात राहील, अगदी तरुण विराट कोहलीची निवड करण्यापासून, जो आता जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. माझ्या कार्यकाळात आणि त्यानंतरही मला पाठिंबा देणाऱ्या सर्व आरसीबी चाहत्यांचे खूप खूप आभार आणि कृपया बंगळूरचे सिंह असलेल्या आरसीबीला असाच पाठिंबा देत राहा. नमस्ते.
एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ₹450 Cr ते ₹16,500 Cr… RCB ट्रॉफीसाठी सांगण्याआधीच सरांनी “ई साला नफा नामदे” म्हटलं.
From ₹450 Cr to ₹16,500 Cr… sir really said “Ee sala profit namde” before RCB could say it for the trophy 😄🔥 Respect for spotting Virat Kohli early though, that investment alone was worth more than a few IPL titles! 🐐💰 Come back to India now. Nimmo Tai has already said… — Soil and Salute 🇮🇳 (@RishiRahar) March 26, 2026
तर दुसऱ्या यूझर्सने लिहीले आहे की, आरसीबीचे सध्याचे मूल्य तुमचे पूर्वीचे सर्व कर्ज सहज फेडू शकले असते.
The current value of RCB could have easily repaid all your earlier debts. — Ravi (@Ravi21259) March 26, 2026
विजय मल्ल्या यांची आता आरसीबीमध्ये कोणतीही हिस्सेदारी राहिलेली नाही. २०१६ च्या सुमारास मल्ल्या यांनी कंपनीवरील नियंत्रण गमावले, जेव्हा डियाजिओने युनायटेड स्पिरिट्स (त्यांची मूळ मालक कंपनी) विकत घेतली. डियाजिओने ती कंपनी बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील समूहाला १.७८ अब्ज डॉलर्स (अंदाजे १६,७०० कोटी रुपये) मध्ये विकली. या व्यवहारातून मल्ल्या यांना काहीही मिळाले नाही.






