Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

IPL 2026 Playoffs Qualification: आयपीएल २०२६ सध्या रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचे समीकरण बदलत आहे. त्यामुळे कोणते संघ टॉप-४ मध्ये आपली जागा निश्चित करतील हे पाहावे लागेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 14, 2026 | 01:56 PM
IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • प्लेऑफची शर्यत रंगली
  • RCB पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी
  • कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री
विराट कोहलीच्या वादळी शतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाइट रायडर्सचा ६ विकेट्सने पराभव केला. बुधवारी(दि.१३) रायपूरमध्ये खेळलेल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने अंगकृष्ण रघुवंशीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १९.१ ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावून १९४ धावा करत सामना जिंकला. यादरम्यान, विराट कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील नववे शतक पूर्ण केले. तो १०५ धावा करून नाबाद राहिला. या विजयामुळे आरसीबी १६ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचली. ज्यामुळे आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, आरसीबीच्या विजयामुळे प्लेऑफ क्वालिफिकेशनचे समीकरण आता पूर्णपणे बददले आहे. यामुळे कोणते संघ टॉप-4 मध्ये एन्ट्री करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

प्लेऑफची शर्यत रंगली

आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ शर्यतीतून मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. तर, दुसरीकडे इतर कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. लीग टप्प्यातील फक्त १३ सामने बाकी आहेत. आरसीबी, जीटी, एसआरएच, पीबीकेएस, सीएसके, आरआर, डीसी आणि केकेआर यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत, परंतु यापैकी काही संघांचे भवितव्य इतर संघांच्या निकालांवर अवलंबून आहे.

कोणत्या संघाकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- RCB ने १६ गुण आणि १. ०५३ च्या नेट रनरेटसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटाकावले आहेत. आरसीबीने १२ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीचे क्वालिफिकेशन हे जवळपास निश्चित आहे.

गुजरात टायटन्स– GT ने १२ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले असून, १६ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे गुजरात टॉप-४ मध्ये आपले स्थान निश्चित करण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबाद– SRH ने १२ पैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे एसआरएची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ७७ टक्के वर्तवली जात आहे.

पंजाब किंग्स– ११ पैकी ६ सामने जिंकून पंजाब १३ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे PBKS प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ६३.६ टक्के इतकी आहे.

चेन्नई सुपर किंग्स– Csk संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. ११ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह ते पाचव्या स्थानी आहेत. त्यामुळे सीएसके क्वालिफाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजस्थान रॉयल्स– RR ने ११ पैकी ६ सामने जिंकून १२ गुण मिळवले आहेत. सध्या गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी आहे. धमाकेदार सुरुवात केलेल्या आरआरची टॉप-४ मध्ये क्वालिफाय होण्याची शक्यता ५३ टक्के आहे.

कोलकाता नाइट रायडर्स– आरसीबीकडून पराभव झाल्यामुळे KKRची प्लेऑफ क्वालिफिकेशनची शक्यता कमी झाली आहे. त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकले तरी ते १५ गुणांपर्यतच पोहचू शकतील.

दिल्ली कॅपिटल्स– कोलकाता प्रमाणेच DC ची देखील प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता फार कमी आहे. दिल्लीने १२ पैकी ५ सामने जिंकून १० गुण मिळवले आहेत.

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव

Web Title: Ipl 2026 playoff qualification scenario virat kohli century rcb vs kkr marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • cricket marathi news
  • IPL 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
1

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे
2

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
3

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
4

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.