मुकेश कुमार मैदानाबाहेर (फोटो सौजन्य - Instagram)
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुकेश कुमारने चार षटके गोलंदाजी करत ३२ धावांत १ बळी घेतला. मुकेशने आरसीबीचा स्फोटक फलंदाज आणि कर्णधार रजत पाटीदारला बाद केले. या डावात रजत पाटीदार आरसीबीसाठी केवळ ८ धावा करू शकला.
आरसीबीने २० षटकांत १७५ धावा केल्या.
या सामन्यातील आरसीबीच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी २० षटकांत ८ गडी गमावून १७५ धावा केल्या. एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत आरसीबीला घरच्या मैदानावर २०० धावांच्या आत रोखले. यावेळी विराट कोहलीची जादू जास्त चालली नाही. दरम्यान विराट कोहलीकडे असणारी ऑरेंज कॅपदेखील शुभमन गिलकडे गेली आहे. विराट कोहलीने यावेळी जास्त खेळ केला नाही. त्यामुळे आरसीबी चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे.
RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना ‘सॉल्ट’ झोंबला; कॅपिटल्सला विजयासाठी ‘इतक्या’ रन्सची गरज
फिल सॉल्टचे सर्वाधिक योगदान
आरसीबीसाठी फिल सॉल्टने ३८ चेंडूंमध्ये ६३ धावांचे सर्वाधिक योगदान दिले. टीम डेव्हिडनेही १७ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या, तर विराट कोहलीने १९, देवदत्त पडिक्कलने १८, जितेश शर्माने १४ आणि कृणाल पांड्याने १२ धावा केल्या. गोलंदाजीत, लुंगी एनगिडी, कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी दिल्लीसाठी प्रत्येकी दोन बळी घेतले. दरम्यान, आरसीबीचा एक फलंदाज धावबाद झाला. नेहमीच्या तुलनेत RCB ने चांगली कामगिरी केली नाही. मात्र दिल्लीच्या डावाची सुरूवातही गडगडली असल्याचे दिसून आले. आता मुकेश कुमारची ही दुखापत किती त्रासदायक आहे आणि दिल्लीच्या संघाला हे कितपत भारी पडणार हेदेखील पहावे लागेल.
RCB Vs DC Toss Live: अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय
पहा मुकेश कुमारचा व्हिडिओ
Oops, that’s hurt Mukesh Kumar pic.twitter.com/tUKaC1FqX5 — Nickk Knight (@KnightNick34590) April 18, 2026






