Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मैदानात उतरण्यापूर्वीच KKR ने टाकला मोठा डाव! रिंकू सिंगकडे सोपवली नवी जबाबदारी

शाहरुख खानच्या मालकीच्या या फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या अध्यायाची घोषणा केली आहे. "गॉड्स प्लॅनमध्ये एक नवीन अध्याय," अशा कॅप्शनसह केकेआरने रिंकूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 09:04 PM
मैदानात उतरण्यापूर्वीच KKR ने टाकला मोठा डाव! (Photo Credit- X)

मैदानात उतरण्यापूर्वीच KKR ने टाकला मोठा डाव! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • KKR चा चाहत्यांना सुखद धक्का
  • रिंकू सिंगकडे सोपवली नवी जबाबदारी
  • अजिंक्य रहाणेचा ‘डेप्युटी’ म्हणून करणार काम
Rinku Singh KKR Vice Captain: आयपीएल 2026 च्या (IPL 2026) हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) एक मोठा निर्णय घेत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. केकेआरचा स्टार फिनिशर रिंकू सिंह (Rinku Singh) याची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शाहरुख खानच्या मालकीच्या या फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नव्या अध्यायाची घोषणा केली आहे. “गॉड्स प्लॅनमध्ये एक नवीन अध्याय,” अशा कॅप्शनसह केकेआरने रिंकूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

भविष्यातील ‘कर्णधार’ म्हणून रिंकूकडे कल?

सध्या केकेआरच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. रहाणेचे वय 37 वर्षे असून, त्याच्या आयपीएल करिअरचा हा अंतिम टप्पा मानला जात आहे. अशा परिस्थितीत, रिंकू सिंहला उपकर्णधार बनवून फ्रँचायझी त्याला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करत असल्याचे दिसून येत आहे. अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली रिंकूला नेतृत्वाचे बारकावे शिकण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, रिंकूला उत्तर प्रदेशच्या देशांतर्गत संघात आणि युपी टी-20 लीगमध्येही कर्णधारपदाचा अनुभव आहे.

God’s plan has a new chapter ✨ pic.twitter.com/2Gsy55mipi — KolkataKnightRiders (@KKRiders) March 24, 2026

55 लाखांपासून 13 कोटींपर्यंतचा प्रवास

रिंकू सिंहची आयपीएलमधील प्रगती थक्क करणारी आहे. 2018 मध्ये जेव्हा तो पहिल्यांदा केकेआरमध्ये आला, तेव्हा त्याला 80 लाखांची बोली लागली होती. 2022 च्या लिलावात त्याची किंमत केवळ 55 लाख रुपये होती. मात्र, २०२३ मध्ये सलग 5 चेंडूत 5 षटकार ठोकून त्याने केकेआरला अशक्य विजय मिळवून दिला आणि त्याचे नशीब पालटले. 2025 च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने त्याला 13 कोटी रुपये देऊन रिटेन केले, जे त्याच्या मेहनतीचे फळ मानले जाते.

IPL 2026 : मोहम्मद कैफचे खळबळजनक विधान, केकेआरने रिंकू सिंगला कर्णधार म्हणून तयार करावे…

रिंकूची आयपीएलमधील आकडेवारी

28 वर्षीय रिंकू सिंहने आतापर्यंत आयपीएलमध्ये 59 सामने खेळले आहेत. यात त्याने 145 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.52 च्या सरासरीने 1099 धावा केल्या आहेत. गेल्या दोन हंगामात त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघाल्या नसल्या तरी (28 सामन्यांत 374 धावा), टी-20 विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे आगामी हंगामात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

29 मार्चला मुंबईविरुद्ध सलामीचा सामना

आयपीएल 2026 मध्ये केकेआरच्या मोहिमेची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर केकेआरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रंगणार आहे. नव्या जबाबदारीसह रिंकू वानखेडेवर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IPL 2026 साठी केकेआरचा पूर्ण स्क्वाड:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह (उपकप्तान), रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन ॲलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप, ब्लेसिंग मुजरबानी.

IPL 2026 च्या आधी रिंकू सिंगला एक मोठी भेट मिळणार, उत्तर प्रदेशमध्ये मिळणार मोठे पद! वाचा सविस्तर

Web Title: Ipl 2026 rinku singh kkr vice captain news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR
  • Rinku Singh
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.