Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi Reaction: मन तुटलं…हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया, पहा वैभवची Insta Story

क्वालिफायर २ मधील पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचे इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे. वैभव सूर्यवंशी विशेषतः दुःखी असून इन्स्टाग्रामवर भावनिक संदेश शेअर केला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 30, 2026 | 03:20 PM
वैभव सूर्यवंशीने शेअर केली पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीने शेअर केली पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पहिल्यांदाच दिली वैभवने प्रतिक्रिया
  • इन्स्टा स्टोरीवर शेअर केली भावूक पोस्ट 
  • सामना हरल्यावर वैभव स्वतःला सांभाळू शकला नव्हता 
आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून ७ गडी राखून हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात राजस्थानसाठी ९६ धावांची शानदार खेळी करणारा वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा शतकाच्या जवळ येऊन बाद झाला. संघाच्या पराभवामुळे वैभव सूर्यवंशी भावूक झाला. डगआऊटमध्ये बसलेला असताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. केवळ वैभवच नाही, तर संपूर्ण राजस्थान रॉयल्स संघ या पराभवाने खचून गेला होता. वैभवला संघातील अनेकांनी सावरण्याचा प्रयत्न केला. अवघ्या १५ वर्षाच्या मुलाची ही अवस्था कोणालाच पाहवत नव्हती. 

वैभवने दिली पहिली प्रतिक्रिया 

मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे झालेल्या सामन्यातील पराभवानंतर, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश शेअर केला. वैभव सूर्यवंशीनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा संदेश शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. संघाच्या पराभवामुळे तो किती खोलवर दुःखी झाला आहे, हे या इन्स्टाग्राम स्टोरीवरून दिसून येते.

RR vs GT: शेवटपर्यंत लढला अन्…डोळ्यात आले पाणी; फायनलचे स्वप्नं भंंगले, Vaibhav Sooryavanshi रोखू शकला नाही अश्रू

काय म्हणाला वैभव

राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वैभवने लिहिले आहे, “२० षटकांत भावना किती लवकर बदलू शकतात यावर अजूनही विश्वास बसत नाही. आजची रात्र खूप वेदनादायी आहे. हे खूप खोलवर बोचत आहे. दुःख, निराशा, वैफल्य आणि अशा अनेक भावना आहेत ज्या आम्हाला सहन कराव्या लागतील. ज्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे. शुभमन गिल आणि गुजरात टायटन्स आज रात्री उत्कृष्ट खेळले.”

वैभवने पुढे म्हटले की, “या मोसमातील सर्व १६ सामन्यांमध्ये ज्यांनी या तरुण संघावर विश्वास ठेवला, आमच्या पाठीशी उभे राहिले, आमचा बचाव केला आणि आम्हाला प्रोत्साहन दिले, त्या सर्वांचे आभार. आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. पण आम्ही माफीही मागतो. तुम्हाला हवी असलेली रात्र देऊ न शकल्याबद्दल क्षमस्व. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्हाला निराश केल्याबद्दल क्षमस्व. हा पराभव आमच्यासोबत राहील आणि पुढच्या मोसमात आम्ही आणखी चांगल्या प्रकारे पुनरागमन करेपर्यंत आम्ही हा क्षण सोबत घेऊन जाऊ.”

वैभवचे सलग दोन सामन्यांमध्ये शतक हुकले

वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी सलग दोन नॉकआऊट सामन्यांमध्ये उत्तम खेळी केली मात्र त्याचे दोन्हीवेळा शतक हुकले होते. क्वालिफायरच्या आधी, वैभवने एलिमिनेटरमध्ये सनरायझर्सविरुद्ध ९७ धावांची विक्रमी खेळी केली. या सामन्यात त्याने ख्रिस गेलचा सिक्सरचा रेकॉर्डही मोडला. इतकंच नाही तर त्याचा दुसरा रेकॉर्ड मोडता मोडता राहिला. त्यानंतर त्याने गुजरातविरुद्धही आपल्या खेळीचा दर्जा दाखवून दिला.

क्वालिफायरमध्ये, वैभवच्या दमदार फलंदाजीमुळे राजस्थानने २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावा केल्या. मात्र, राजस्थानचे गोलंदाज ही धावसंख्या वाचवू शकले नाहीत आणि शुभमनच्या शतकामुळे गुजरात टायटन्सने १८.४ षटकांतच लक्ष्य गाठले. ही बोच नक्कीच वैभवच्या जिव्हारी लागली आहे हे त्याच्या पहिल्याच प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे. 

‘संपूर्ण जगात कुठेही मोफत शिक्षण आणि स्कॉलरशिप…’ वैभव सूर्यवंशीवर फिदा ललित मोदी, दिली मोठी ऑफर

Web Title: Ipl 2026 rr vs gt vaibhav sooryavanshi first reaction after losing qualifier 2 match shared emotional message on insta story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद
1

19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद

GT Vs RCB Final Pitch Report: ‘प्रिन्स’ विरुद्ध ‘किंग’; कोण उचलणार ट्रॉफी? पहा अहमदाबादचा पीच रिपोर्ट
2

GT Vs RCB Final Pitch Report: ‘प्रिन्स’ विरुद्ध ‘किंग’; कोण उचलणार ट्रॉफी? पहा अहमदाबादचा पीच रिपोर्ट

Vaibhav Sooryavanshi: ‘IPL गाजवलं, आता टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज’, वैभव सूर्यवंशीबद्दल कुमार संगकाराचे मोठे विधान
3

Vaibhav Sooryavanshi: ‘IPL गाजवलं, आता टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज’, वैभव सूर्यवंशीबद्दल कुमार संगकाराचे मोठे विधान

Sai Sudarshan: अरे देवा आता तर सगळी हद्दच पार! दुसऱ्यांदा विचित्र पद्धतीने गेली विकेट, शुभमनची तीव्र नाराजी कॅमेऱ्याने टिपली
4

Sai Sudarshan: अरे देवा आता तर सगळी हद्दच पार! दुसऱ्यांदा विचित्र पद्धतीने गेली विकेट, शुभमनची तीव्र नाराजी कॅमेऱ्याने टिपली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.