फोटो सौजन्य - chennaiipl
Sanju Samson M.S. Dhoni video viral : आयपीएल २०२६ अवघ्या काही दिवसांवर आहे. १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. यावर्षी अनेक खेळाडू नवीन फ्रँचायझींसाठी खेळताना दिसतील. संजू सॅमसन सीएसकेकडून, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. आयपीएलच्या आधी संजू सॅमसन सीएसकेच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. तो एम.एस. धोनीसोबत गप्पा मारतानाही दिसला.
आयपीएल २०२६ च्या आधीच सीएसकेने प्री-सीझन कॅम्प सुरू केले आहेत. संजू सॅमसन देखील या प्री-सीझन कॅम्पचा एक भाग आहे. सीएसकेने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एमएस धोनी आणि संजू सॅमसन बोलताना दिसत आहेत. चेपॉकच्या मैदानावर हे दोघे बराच वेळ संवाद साधत आहेत. यादरम्यान, धोनी संजूला काहीतरी समजावून सांगतानाही दिसत आहे. संजू पहिल्यांदाच सीएसकेचा भाग बनला आहे. तो सीएसकेसाठी खेळण्यास उत्सुक आहे. मागच्या वेळी संजू राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.
मात्र, दुखापतीमुळे तो सर्व सामने खेळू शकला नाही. मात्र, या वेळी संजू सीएसकेसाठी सर्व सामने खेळताना दिसू शकतो. संजू सॅमसनने २०२६ च्या टी२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने भारतासाठी शेवटच्या तीन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. यासाठी त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले. संजूने महत्त्वाच्या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ धावा केल्या, त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ८९ आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावा केल्या. या स्पर्धेत संजूने पाच सामन्यांमध्ये ८०.२५ च्या सरासरीने ३२१ धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्सचा दीर्घकाळ सदस्य असलेला संजू सॅमसन आता पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना इतर संघांमध्ये पाठवून एका मोठ्या ट्रेडद्वारे त्याला संघात सामील करण्यात आले आहे. संजू सॅमसनकडे सीएसकेचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. तो एमएस धोनीचा वारसा पुढे नेऊ शकतो, असे मानले जाते. यष्टीरक्षण आणि फलंदाजी या दोन्हीमधील त्याची कौशल्ये संघासाठी निर्णायक ठरू शकतात.






