भीषण अपघात ते २७ कोटींचा मानकरी; ऋषभ पंत ठरला सर्वात IPL मधील सर्वात महागडा खेळाडू
भीषण अपघात आणि जवळपास १ वर्षांनंतर भारतीय संघात आणि २ वर्षांनंतर संघात पुनरागमन ठरणारा ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर २७ कोटींची बोली लागली आहे. अवघ्या काही मिनिटातच श्रेयस अय्यरचा महागडा खेळाडू ठरल्याचा विक्रम मोडीत काढला. श्रेयस अय्यर २६.७५ कोटींना लिलावात सोल्ड झाला होता. पण २० कोटींच्या बोलीनंतर लखनौ संघाने थेट ७ कोटींची बोली लावत पंतला आपल्या संघात सामील केलं.
ऋषभ पंत २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. काही मिनिटातच तो १० कोटींच्या पुढे पोहोचला. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाला. पण तरीही लखनौनेही हार मानली नाही. हैदराबादची मालक काव्या मारन आणि लखनौचे मालक संजय गोयंका यांची पंतसाठी चढाओढ सुरू झाली. बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. हैदराबाद आणि लखनौ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली.
लखनौने पंतसाठी २०.७५ कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी विक्रमी थेट २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला. अशाप्रकारे पंतला २७ कोटी रुपयांसह लखनऊने आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात सामील केले.
ऋषभ पंत ने २०१६ मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले. ऋषभ पंतच्या आयपीएल कारकीर्दीत त्याने एक शतक आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. पंतने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील १११ सामन्यांमध्ये १४८.९३ च्या स्ट्राईकरेटने ३२८४धावा केल्या आहेत. आयपीएल मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ही १२८ धावा आहे. तर पंत नेत्याच्या कारकीर्द २९६ चौकार आणि १५४ षटकार लगावले आहेत. ऋषभ हा आपल्या बेधडक आणि विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो त्याचबरोबर विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतानाही तो उत्कृष्ट कामगिरी करतो.
ऋषभ पंतच्या नावावर आयपीएल मध्ये दोन अनोखे विक्रम आहेत. हा मधल्या फळीत फलंदाजी करणारा फलंदाज आहे. मधल्या फळी फलंदाजी करताना २०१८ च्या आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक ५७९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर २०१८ च्या आयपीएल सीझनमध्ये ऋषभ पंत ने सर्वाधिक ३७ षटकारही लगावले होते. नॉन ओपनर म्हणून एखाद्या खेळाडूने आयपीएलमध्ये लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत, त्याचा विक्रम आजवर कोणीही मोडू शकलेला नाही.
२०२२ मध्ये ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाला होता, यानंतर आयपीएल २०२३ मध्ये तो खेळताना दिसला नाही आणि त्यानंतर आयपीएल २०२४ मध्ये त्याने शानदार पुनरागमन केलं. आयपीएल मधून पुनरागमन करताना तो टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग ठरला आणि या सामन्यांमध्ये देखील त्याने संघासाठी मोठी भूमिका बजावली.