विमान दुर्घटनेवर रोहित शर्मासह इरफान पठाण झाले दुःखी(फोटो-सोशल मिडिया)
Ahmedabad plane crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवार १२ मे रोजी दुपारी एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही घटना घडली असून अपघातात १३३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असता टेक ऑफ नंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली.या दुर्घटनेनंतर जगभरातील विविध क्षेत्रातून भावुक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भारतीय क्रिकेट जगत देखील या घटनेने शोकाकुल झाले आहे. भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी गोलंदाज इरफान पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : ‘हे ऐकून खूप धक्का बसला…’, Ahmedabad plane crash वर Harbhajan Singh ची भावुक प्रतिक्रिया..
अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह १३३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेवर आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादहून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात जीव गमावलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.”
हेही वाचा : WTC Final : मिचेल स्टार्कने रचला इतिहास; मोहम्मद शमीचा विक्रम मोडून दिला मोठा झटका..
या दुर्घटने भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण हा देखील व्याकुळ झाला आहे. इरफान पठाण याने देखील अहमदाबादमधील घटनेवर दुःख व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की “आज अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल मी खूप दुःखी आहे. मी प्रवासी, क्रू आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहे.”
Rohit Sharma’s Instagram story for Ahmedabad plane crash. 🙏 pic.twitter.com/LIFezQyvQ0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 12, 2025
गुरुवार, १२ मे रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान अचानक आणि त्याचा भला मोठा स्फोट झाला. हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (फ्लाइट एआय१७१) होते, जे अहमदाबादहून लंडनसाठी निघाले होते. परंतु, उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये मेघनीनगर परिसरात दुर्घटना घडली. या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. आतापर्यंत १३३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळेत आहे.