Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Points Table मध्ये टीम इंडियाची बल्ले-बल्ले! वेस्ट इंडिजने बांग्लादेशला दिला धक्का, भारताचा थेट ‘या’ क्रमांकावर कब्जा

India Rise To Fourth WTC 2025-27 Bangladesh to fifth following loss to WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांग्लादेशला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारतीय संघाला फायदा झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 06:08 PM
India Rise To Fourth WTC 2025-27

India Rise To Fourth WTC 2025-27

Follow Us
Follow Us:
  • WTC गुणतालिकेत मोठा उलटफेर
  • बांग्लादेश पाचव्या स्थानी घसरला
  • भारताची चौथ्या क्रमांकावर एन्ट्री
WTC Points Table 2025-27: बांग्लादेश क्रिकेट संघ मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार कामगिरी करत यजमान बांग्लादेशचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ चा एक भाग आहे. अशा परिस्थितीत, वेस्ट इंडिजच्या या विजयाचा भारतीय संघाला थेट फायदा झाला आहे. बांग्लादेशच्या पराभवानंतर, टीम इंडियाने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ५ व्या स्थानावरून ४ थ्या स्थानावर एक स्थानाची झेप घेतली आहे.

IND vs NZ : शेवटच्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल? 5 खेळाडूंचा पत्ता कट? ‘या’ नव्या शिलेदारांना संधी

घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजने केला बांग्लादेशचा पराभव

ढाका कसोटीत बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशने पहिल्या डावात २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजला केवळ २४५ धावाच करता आल्या. यामुळे यजमानांना २७ धावांची आघाडी मिळाली. मात्र, दुसऱ्या डावात बांग्लादेशचा संघ गडबडला आणि केवळ १४२ धावांवर गारद झाला. यानंतर, वेस्ट इंडिजला चौथ्या डावात १७० धावांचे लक्ष्य देण्यात आले. कॅरिबियन संघाने केवळ दोन विकेट्स गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. वेस्ट इंडिजने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. संघाच्या विजयात ब्रँडन किंगच्या ८१ धावा आणि जॉन कॅम्पबेलच्या ४९ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या.

बांग्लादेशच्या पराभवाचा भारताला डब्ल्यूटीसी गुणतालिकेत फायदा

दरम्यान, बांग्लादेशच्या पराभवामुळे डब्ल्यूटीसी २०२५-२७ च्या गुणतालिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. या सामन्यापूर्वी, बांगेलादेश ५५.५६ टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर होता. परंतु पराभवानंतर, त्यांची गुण टक्केवारी ४७.६२ पर्यंत घसरून ते पाचव्या स्थानावर आले. याचा फायदा भारतीय संघाला झाला. पूर्वी पाचव्या स्थानावर असलेला भारतीय संघ आता ५१.५२ टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज २६.९२ टक्के गुणांसह आठव्या स्थानावर कायम आहे. परंतु, या विजयामुळे त्यांच्या गुण टक्केवारीत सुधारणा झाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची

डब्ल्यूटीसी२०२५-२७ च्या गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या स्थानावर पोहोचला असला तरी, अंतिम फेरीपर्यंतचा त्याचा मार्ग अजूनही सोपा नाही. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडविरुद्धची आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका संघासाठी निर्णायक ठरेल. भारत १९ नोव्हेंबरपासून आपल्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अंतिम फेरीतील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल.

IND vs ENG: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! पण इंग्लंडने शेवटच्या क्षणी मारली बाजी; हाँगकाँग सिक्सेसमध्ये Team India चा सलग तिसरा पराभव

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी कोणी जिंकली?

    Ans: ढाका येथे झालेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने बांग्लादेशचा ८ विकेट्सने पराभव केला.

  • Que: बांगलादेशच्या पराभवाचा टीम इंडियाला काय फायदा झाला?

    Ans: बांग्लादेशच्या पराभवानंतर भारतीय संघ WTC गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला.

  • Que: WTC 2025-27 गुणतालिकेत टीम इंडिया कितव्या क्रमांकावर आहे?

    Ans: भारतीय संघ ५१.५२ टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Web Title: Wtc points table 2025 27 india rises fourth bangladesh falls fifth after west indies win pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs NZ : शेवटच्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल? 5 खेळाडूंचा पत्ता कट? ‘या’ नव्या शिलेदारांना संधी
1

IND vs NZ : शेवटच्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल? 5 खेळाडूंचा पत्ता कट? ‘या’ नव्या शिलेदारांना संधी

IND VS NZ: उद्या शेवट गोड करण्याची संधी; भारत-न्यूझीलंड किती वाजता आणि कुठे भिडणार?
2

IND VS NZ: उद्या शेवट गोड करण्याची संधी; भारत-न्यूझीलंड किती वाजता आणि कुठे भिडणार?

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री
3

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ
4

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.