Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammad Shami : ‘धर्मांध मूर्खांची पर्वा करू नका..’; शमीचे समर्थन करत जावेद अख्तरांनी मौलाना शहाबुद्दीनला सुनावले खडे बोल..   

क्रिकेटर मोहम्मद शमीच्या एनर्जी ड्रिंकचा विषय चर्चेत आला असून या वादात आता लेखक जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शमीचे समर्थन दर्शवत मौलाना शहाबुद्दीनला मूर्ख म्हटले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 08, 2025 | 09:58 PM
Mohammad Shami: 'Don't care about religious fanatics..'; Javed Akhtar, supporting Shami, gave strong words to Maulana Shahabuddin..

Mohammad Shami: 'Don't care about religious fanatics..'; Javed Akhtar, supporting Shami, gave strong words to Maulana Shahabuddin..

Follow Us
Close
Follow Us:

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या सामन्याची उत्सुकता ताणली जात असताना मोहम्मद शमीबाबत एक मुद्दा सध्या जोरात गाजत आहे. क्रिकेटर मोहम्मद शमीच्या एनर्जी ड्रिंकचा विषय चर्चेत आला आहे. या वादात आता लेखक जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शमीचे समर्थन दर्शवत मौलाना शहाबुद्दीनला मूर्ख म्हटले आहे. अख्तर म्हणाले की, ‘तुम्ही या धर्मांध मूर्खांची पर्वा करू नका. ज्यांना दुबईच्या कडक उन्हात पाणी पिल्याने त्रास होतो.’

नेमकं प्रकरण काय?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पितानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचे अनेकांनी कौतुक केले. सर्वांनी सांगितले की शमीने रमजान महिन्यात राष्ट्रीय कर्तव्यापोटी उपवास सोडला. मात्र, ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी गुरुवारी या चित्रासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला. त्यात मौलानाने मोहम्मद शमीला उपोषण मोडल्याबद्दल गुन्हेगार म्हटले होते. त्याच्यावर टीका केली होती.

Shami saheb , don’t give a damn to those reactionary bigoted idiots who have any problem with your drinking water in a burning afternoon at a cricket field in Dubai . It is none of their business. You are one of the great Indian team that is making us all proud My best wishes…

— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 7, 2025

हेही वाचा : IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी सलामीवीर रोहित शर्मा-शुबमन गिल भारतीय संघापासून दूर; नेमकं असं काय घडलं? पहा Video

जावेद अख्तर काय म्हणाले?

या संपूर्ण वादात आता प्रसिद्ध कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी शमीचे समर्थन केले आहे. त्यांनी आपल्या एक्स हॅंडलवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे कि,’शमी साहेब, दुबईतील क्रिकेट मैदानावर जळत्या दुपारी तुमच्या पिण्याच्या पाण्याबद्दल ज्यांना काही अडचण आहे, त्या प्रतिगामी धर्मांध मूर्खांची पर्वा करू नका. हा त्यांचा व्यवसाय नाही. तुम्ही त्या महान भारतीय संघांपैकी एक आहात जो आम्हा सर्वांना अभिमानास्पद बनवत आहे. तुम्हाला आणि आमच्या संपूर्ण संघाला माझ्या शुभेच्छा.’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

हेही वाचा : Women’s Day Special : आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सकडून ‘पिंक प्रॉमिस’ जर्सी लाँच; ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदनात…

मौलाना शहाबुद्दीन काय म्हणाले होते?

मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले होते की, शरियतचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच इस्लाममध्ये उपवास हे कर्तव्य आहे. जर एखादी व्यक्ती जाणूनबुजून उपवास करत नसेल तर त्याला इस्लामिक कायद्यानुसार पापी मानले जाते. क्रिकेट खेळणे वाईट नाही, पण धार्मिक जबाबदारीही पार पाडायला पाहिजे. मी शमीला शरियतचे नियम पाळण्याची आणि त्याच्या धर्माप्रती जबाबदार राहण्याची सूचना देत आहे.

 

Web Title: Javed akhtar spoke harsh words to maulana shahabuddin in support of mohammad shami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • IND vs NZ
  • Mohammad Shami
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
1

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
4

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.