Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर बाबर आझमने रागामध्ये त्याच्या बॅट स्टंपवर आदळली होती. त्याच्या या कृतीमुळे आयसीसीकडून आझमवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 18, 2025 | 04:55 PM
Showing anger on the field cost me dearly! Babar Azam sentenced by ICC: What is the real issue?

Showing anger on the field cost me dearly! Babar Azam sentenced by ICC: What is the real issue?

Follow Us
Close
Follow Us:

ICC fines Babar Azam : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मैदान्त रंग व्यक्त करणे चांगलेच महाग पडले आहे. आयसीसीकडून बाबर आझमवर कडक कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर त्याने रागाने त्याच्या बॅट स्टंपवर आदळली होती, ज्यामुळे त्याला आता मोठा दंड ठोठावण्यात आला. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी अपेक्षित असताना तो ३४ धावांवर बाद झाला आणि त्याने आपला संयम गमावल. या घटनेमुळे बाबरच्या अडचणी वाढ झाली आहे.

हेही वाचा : Ashes series 2025: ‘या’ गोलंदाजांनी गाजवली अ‍ॅशेस मालिका! ऐतिहासिक मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण?

आयसीसीची आझमवर कडक कारवाई

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये बाद झाल्यानंतर भावनांवर नियंत्रण न ठेवू शकलेल्या आझमला आता महागात पडले आहे. २१ व्या षटकात विकेट गमावल्यानंतर त्याने रागाने थेट स्टंपवर बॅट आदळली. मैदानावरील पंच अ‍ॅलेक्स व्हार्फ आणि रशीद रियाझ यांच्याकडून थर्ड अंपायर शर्फुद्दीन शाहिद यांच्यासह ताबडतोब ही घटना सामनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास  आणून देण्यात आली.

शिक्षेचे कारण काय?

बाबर आझम आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे, जो खेळाडूंना कोणत्याही क्रिकेट उपकरणाचे नुकसान करण्यास मनाई करत असतो. चौकशीनंतर, सामनाधिकारी अली नक्वी यांनी बाबर आझमवर ला त्याच्या सामन्याच्या फीच्या १०% दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देखील नोंदवण्यात आला आहे.  हा गुन्हा लेव्हल १ चा मानला जातो, जो गंभीर मानला जात नाही. तथापि, बाबर आझम धोका कायम आहे. जर बाबरने असे वर्तन पुन्हा केले तर त्याला त्याच्या सामन्याच्या फीच्या ५०% पर्यंत अतिरिक्त दंड होण्याची शक्यता आहे आणि त्याचे डिमेरिट पॉइंट वाढल्याने निलंबनाचा धोका वाढणार आहे.

बाबरची एकदिवसीय मालिकेत कामगिरी

बाबर आझमवर बंदी असूनही, ही मालिका बाबर आझमसाठी सकारात्मक राहिली. त्याने तीन सामन्यांमध्ये १६५ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एका शानदार शतकाचा समावेश होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, त्याने नाबाद १०२ धावा करून दोन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला होता.

मालिकेतील त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक देखील झाले आहे. परंतु तिसऱ्या सामन्यातील भावनिक चुकीमुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली. आता, त्याला आगामी सामन्यांमध्ये त्याच्या वर्तनाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा वाढत्या डिमेरिट पॉइंट्स एक मोठे समस्या निर्माण होऊ शकते.

हेही वाचा : IPL 2026 ! एडन मार्करमने मानले LSG चे आभार! नव्या IPL हंगामाची करणार जोरदार सुरुवात

Web Title: Icc punishes babar azam for showing anger on the field in pak vs sl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • Babar Azam
  • ICC
  • PAK vs SL

संबंधित बातम्या

LIVE सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टने बाबर आझमची बेइज्जत, फलंदाजीच्या पद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
1

LIVE सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टने बाबर आझमची बेइज्जत, फलंदाजीच्या पद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Big Bash League : ऑस्ट्रेलियामध्ये बाबर आझमची नको ती कृती! भारतीय चाहत्यांचा संताप अनावर; वाचा नेमकं काय घडलं? 
2

Big Bash League : ऑस्ट्रेलियामध्ये बाबर आझमची नको ती कृती! भारतीय चाहत्यांचा संताप अनावर; वाचा नेमकं काय घडलं? 

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 
3

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.