Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

Josh Tongue Took 50 wickets in WTC 2025-27 Cycle: इंग्लंडचा वेगवान गोलंदजा जोश टंग हा WTC 2025-27 च्या चालू हंगामात सर्वाधिक ५० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 04:32 PM
WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
Follow Us
Follow Us:
  • WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ
  • 50 विकेट्स घेणारा पहिला बॉलर
  • टॉप-5 मध्ये कोण?
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंग हा २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रात ५० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने लीड्समधील हेडिंग्ले येथे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली. त्याने इंग्लंडसाठी दमदार कामगिरी करत ५ विकेट्स घेतले. टंगने केवळ १० सामन्यांमध्ये ही कामगिरी केली असून, तो चालू डब्ल्यूटीसी हंगामात ५० विकेट घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्याने या चक्रात आतापर्यंत तीन वेळा एका डावात पाच विकेट घेतले आहेत.

 

टंग हा २०२५ च्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीदरम्यान इंग्लंडचा सर्वात प्रभावी गोलंदाजही होता. २०२५-२७ च्या डब्ल्यूटीसीमधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टंग अग्रस्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क नऊ सामन्यांत ४८ विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचा मोहम्मद सिराज १० सामन्यांत ४१ विकेटसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

 

WTC २०२५-२७ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

  • जोश टंग – ५० विकेट्स
  • मिचेल स्टार्क- ४८ विकेट्स
  • मोहम्मद सिराज- ४१ विकेट्स
  • बेन स्टोक्स- ३९ विकेट्स
  • शमर जोसेफ- ३५ विकेट्स

जोश टंगने इतिहास रचला

जोश टंग हा डब्ल्यूटीसीच्या एकाच हंगामात ५० विकेट्स घेणारा सहावा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडसाठी हा पराक्रम केला होता. त्याने २०१९-२१ च्या फेरीत १७ सामन्यांमध्ये ६९ विकेट्स घेतले होते. जे कोणत्याही इंग्लिश गोलंदाजाने एकाच हंगामात घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आहे.

२०२१-२३ च्या विश्वचषक स्पर्धेत जेम्स अँडरसनने इंग्लंडसाठी ५८ विकेट्स घेतले, तर त्याच फेरीत ऑली रॉबिन्सनने ५३ विकेट्स घेतले. यानंतर, २०२३-२५ च्या हंगामात गस ऍटकिन्सनने ११ सामन्यांमध्ये ५२ विकेट्स घेतले आणि ख्रिस वोक्सने १२ सामन्यांमध्ये ५१ फलंदाजांना बाद केले. टंग १० सामन्यांमध्ये ५० विकेटसह या खेळाडूंच्या पंक्तीत सामील झाला आहे.

टंग WTC मध्ये कोणते रेकॉर्ड करू शकतो?

एकाच WTC हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नॅथन लायनच्या नावावर आहे. या ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने २०२१-२३ च्या चक्रात २० सामन्यांमध्ये ८८ फलंदाजांना बाद केले. एकाच WTC हंगामात कोणत्याही गोलंदाजाने घेतलेले हे सर्वाधिक विकेट्स आहेत. विशेषतः, वेगवान गोलंदाजांमध्ये, पॅट कमिन्सने २०२३-२५ च्या WTC मध्ये ऑस्ट्रेलियासाठी १८ सामन्यांमध्ये ८० विकेट्स घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. परंतु २०२५-२७ चे चक्र अजूनही सुरू असल्याने, टंगकडे या आकड्यांच्या जवळ पोहोचण्याची संधी आहे.

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?

Web Title: Josh tongue 1st bowler to take 50 wickets wtc 2025 27 top bowlers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • England cricket
  • Josh Tongue
  • PAK vs ENG
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.