मुंबई– BCCI नं 2022-23 वर्षासाठी भारतीय मेन्स क्रिकेट टीमचा (Indian cricket team) सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केलाय. यात 26 प्लेअरस्ना रिटेनरशीप देण्यात आलीये. बीसीसीआय (BCCI) चार कॅटेगरीत क्रिकेटर्सशी कॉन्ट्रॅक्ट करते.
काय आहेत चार कॅटेगरी
1.A+ श्रेणीत येणाऱ्या क्रिकेटर्सना 7 कोटी देण्यात येतात.
2.A श्रेणीत येणाऱ्यांना 5 कोटी देण्यात येतात
3. B श्रेणीत येणाऱ्यांना ३ कोटी देण्यात येतात
4.C श्रेणीत येणाऱ्यांना 1 कोटी देण्यात येतात.
या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक बाबी BCCIनं स्पष्ट केल्या आहेत.
भुवनेश्वर-रहाणेसह अनेक दिग्गजांचा पत्ता कट
BCCIनं या नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भुवनेश्वर कुमार, अजिंक्य राहणे, इशांत शर्मा, रिद्धीमान साहा यांना यादीत स्थानच दिलेले नाही. हे काही दिवसांपूर्वी पर्यंत टीमचे महत्त्वाचे प्लेअर्स होते. मात्र आता BCCIनं त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही, असे संकेत दिलेत.
शिखर धवनला संधी
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन सध्या टीमबाहेर होता. मात्र BCCIनं सेंट्र्ल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला सी श्रेणीत स्थान दिलंय. त्यामुळं शिखर धवनचं पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या वर्षी वर्ल्ड़कप आहे आणि आयसीसी टुर्नामेंटं खेळण्याचा मोठा अनुभव धवनकडे आहे.
के एल राहुललाही वॉर्निंग
एल राहुलच्या कामगिरीत गेल्या काही काळापासून सातत्याचा अभाव असल्याचं दिसत होतं. त्याच्याकडून वनडे आणि टी-20 ची व्हाईस कॅप्टन्सी आधीच काढून घेण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचं डिमोशन करण्यात आलंय. गेल्यावेळी तो ए श्रेणीत होता, यावर्षी त्यावा बी श्रेणीत घेण्यात आलंय. गेम सुधारला नाही तर पुढच्या वर्षी यादीत नसशील, असे संकेतच यातून देण्यात आलेत.
जडेजा परतल्यानंतरही अक्षर महत्त्वाचाच
रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुन्हा परतलाय. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती. जडेजा परतल्यानंतरी अक्षरची कामगिरी चांगली होती. त्यामुळं अक्षरचं प्रमोशन बी श्रेणीतून ए श्रेणीत करण्यात आलंय. जडेजा परतल्यानंतरही अक्षर पटेल महत्त्वाचा प्लेअर असल्याचं BCCIनं दाखवून दिलंय.