Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

Kabaddi Tournament : शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत पंचगंगा सेवा मंडळाने कुमार गटात विजयी सलामी दिली. अटीतटीच्या लढतीत पंचगंगाने गोल्फादेवी सेवा मंडळाचा 48-47 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 12, 2026 | 06:06 PM
Kabaddi Tournament : पंचगंगाची 'सुपर' सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

Kabaddi Tournament : पंचगंगाची 'सुपर' सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

Follow Us
Follow Us:
  • माजी महापौरांच्या हस्ते उद्घाटन
  • गुडेटी मोजेस व जितेंद्र पाटीलची कडवी झुंज
  • कुमार गटात समर्थ स्पोर्ट्सची आगेकूच
 

शिवांश मगरच्या पल्लेदार चढाया आणि वेदांत देसाईच्या पोलादी पकडीच्या जोरावर पंचगंगा सेवा मंडळाने शिवनेरी कबड्डी स्पर्धेच्या (Kabaddi Tournament) कुमार गटात विजयी सलामी दिली. अटीतटीच्या लढतीत पंचगंगाने गोल्फादेवी सेवा मंडळाचा 48-47 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्याने क्रीडाप्रेमींची उत्सुकता वाढवली.

शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने भवानी माता क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी महोत्सवाचे यंदा 58 वे वर्ष आहे. मानाच्या शिवनेरी कबड्डी स्पर्धेने दरवर्षी मुंबईतील कबड्डी हंगामाला सुरुवात होते. यंदाच्या महोत्सवात विशेष व्यावसायिक, प्रथम श्रेणी व्यावसायिक, कुमार आणि महिला अशा चार गटांमध्ये सामने रंगणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुमार गटातील चुरशीच्या सामन्यांनी लक्ष वेधून घेतले.

माजी महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी विधानसभाप्रमुख व निखिल लॉजिस्टिकचे व्यवस्थापक सुरेश कदम, स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ, सुनीता आयरे, हरदीपसिंग लाली, प्रशांत घाडीगावकर, मंडळाचे प्रमुख कार्यवाह व उपविभागप्रमुख नितीन पेडणेकर, अध्यक्ष सुयोगी नाईक, कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, देविदास कदम, सचिन मांजरेकर, किरण मोरजकर, संजय माजरेकर, शाखाप्रमुख समीर दळवी आणि सुरेश काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

गुडेटी मोजेस व जितेंद्र पाटीलची कडवी झुंज

पंचगंगा सेवा मंडळाने मध्यंतराला 24-23 अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत टिकवून ठेवली. गोल्फादेवी सेवा मंडळाच्या गुडेटी मोजेस आणि जितेंद्र पाटील यांनी कडवी झुंज देत उत्तरार्धात जोरदार मुसंडी मारली. मात्र, अखेरच्या क्षणी विजयाचे पारडे पंचगंगाच्या बाजूने झुकले. पुढील फेरीत पंचगंगा सेवा मंडळासमोर यश क्रीडा मंडळाचे आव्हान असेल. यश क्रीडा मंडळाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती.

कुमार गटातील अन्य सामन्यांत समर्थ स्पोर्ट्स क्लबने संस्कृती प्रतिष्ठानचा 53-38 असा 15 गुणांनी पराभव केला. समर्थकडून चढाईत विराज कोंडावळे आणि पकडीमध्ये अथर्व मोहिते यांनी प्रभावी कामगिरी केली. संस्कृती प्रतिष्ठानकडून मनोज गोरे आणि सार्थक जाधव यांनी चांगला खेळ केला.

Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?

दुसऱ्या सामन्यात गोकुळ क्रीडा मंडळाने वीर संताजी क्रीडा मंडळावर 41-38 अशी तीन गुणांनी मात केली. गोकुळकडून स्मित फाटक आणि दिव्यांश लाखन यांनी चढाईत, तर ऋषभ हजारे यांनी पकडीमध्ये मोलाचे योगदान दिले.

अन्य लढतींमध्ये बंड्या मारुती संघाने नवनाथ क्रीडा मंडळाचा 46-37 असा, तर आकांक्षा क्रीडा मंडळाने एफडर्स युनायटेडचा 33-23 असा पराभव केला. सिद्धी प्रभा फाउंडेशनने गणेश स्पोर्ट्स क्लबवर 55-25 असा 30 गुणांनी दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

Web Title: Kabaddi tournament panchganga beat golfadevi by one point rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Kabaddi Tournament
  • Mayor
  • Sports

संबंधित बातम्या

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
1

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament  वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार
2

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम
3

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास
4

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.