
कायरन पोलार्डने बुमराहच्या फॉर्मवर केले भाष्य
जसप्रीत बुमराहला आयपीएलमध्ये अपेक्षित यश नाही
मुंबई इंडियन्सला जाणवते बुमराहच्या फॉर्मची उणीव
Mumbai Indians On IPL 2026: आयपीएलचा थरार सुरू होऊन जवळपास महिना होऊन गेला आहे. आता सर्व संघांची प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी स्पर्धा चुरशीची झाली आहे. मात्र सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. 8 पैकी फक्त 2 च सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराहला अद्याप सूर गावसलेला दिसून येत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता यावर यावर एमआयच्या कोचने भाष्य केले आहे.
कालच्या सामन्यांत एसआरएचने मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव केला आहे. मुंबईला 6 विकेटने पराभूत केले गेले. मुख्य गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह देखील सध्या अपयशी ठरताना दिसून येत आहे. त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड याने बुमराहची पाठराखण करताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
IPL 2026: मॅडनेस! Rickelton चं 44 चेंडूत शतक; जयसूर्याचा विक्रम आता भूतकाळ
जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू खराब कामगिरी करतो, तेव्हा तो लगेच चर्चेचा विषय ठरतो. सामान्य नोकरी करणाऱ्या लोकांचे उदाहरण पोलार्डने दिले. एखाद्या व्यक्तीने ऑफिसमध्ये चुकीचा ईमेल पाठवला, तर त्यांच्याकडे तो सुधारण्याची संधी असते. मात्र, आमच्या बाबतीत मैदानात अशी मिळत नाही. एकदा बॉल फेकला, चूक झाली की सुधारता येत नाही. मी बुमराहला अत्यंत जवळून ओळखतो.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ 2 च सामने जिंकले आहेत. बाकी सर्व सामन्यात मुंबईला हार पत्करावी लागली. मात्र या सर्व सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने केवळ 2 च विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी फारशी साजेशी राहिलेली नाही. त्यामुळे आता जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
SRH Vs MI Live: मुंबईची ‘पलटण’ गार! ट्रेविस हेडने संपवलं मुंबईचं IPL मधील आव्हान
एसआरएचकडून मुंबईचा दारुण पराभव
मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मुंबई इंडियन्सने एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट दिले होते. एसआरएच कडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जबरदस्त सुरुवात केली. अखेर या सामन्यात एसआरएचने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील 6 वा पराभव झाला आहे. आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपूष्टात आले आहे.