PBKS vs KKR : IPL 2025 मध्ये केकेआरचा खेळाडू करत होता फसवणूक, पंचांचं लक्ष गेलं अन् रंगेहात..
PBKS vs KKR : आयपीएल २०२५ मध्ये ३१ सामने खेळले गेले आहेत. काल मंगळवार रोजी(१५ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना १६ धावांनी आपल्या नावे केला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद केवळ १११ धावा केल्या. केकेआरच्या गोलंदाजासमोर पंजाबचे फलंदाज काही करू शकले नाही. तसेच पंजाबच्या गोलंदाजांनी देखील पलटवार करुन केकेआरच्या संघाला ९५ धावांवरच रोखले. सामन्यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूसोबत अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याला त्याची बॅट बदलून घ्यावी लागली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिच नोर्कियाला पंजाब किंग्जविरुद्ध आपली बॅट बदलावी लागली. त्यानंतरच त्याला पंचाकडून फलंदाजीची परवानगी देण्यात आली.
अँरिक नोर्कियाच्या बॅटची रुंदी जास्त भरल्याने तो बॅट मापन चाचणीत नापास झाला. मैदानावरील पंचांकडून त्याला त्याची बॅट बदलण्यास सांगण्यात आले. केकेआरच्या डावाच्या १६ व्या षटकाच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. यानंतर अँरिक नोर्किया लगेच बॅट बदलली. या घटनेबद्दल, टीव्ही समालोचकांनी सांगितले की बॅट निश्चित नियमांपेक्षा वेगळी असल्याने ती बदलावी लागली.
हेही वाचा : LA Olympics २०२८ : १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन, अमेरिकेत होणार आयोजन, जय शाहांची घोषणा..
यापूर्वी आयपीएलमध्ये, बॅटची जाडी आणि रुंदी ड्रेसिंग रूममध्येच मोजली जात होती. नियमांनुसार, बॅटची रुंदी १०.७९ सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. बॅटची जाडी ६.७ सेमी पेक्षा जास्त आणि कडाची रुंदी ४ सेमी पेक्षा जास्त नसावी. बॅटची लांबी ९६.४ सेंटीमीटरपर्यंत पोहोचू शकते. असे नियम आहेत.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी बॅटच्या तपासणीच्या अहवालात सांगितले की, कोणीही अन्याय्य फायदा घेत आहे, असे कोणालाही वाटू नये. बीसीसीआय आणि आयपीएल नेहमीच खेळात समानता राखण्यासाठी प्रयत्नशील असते. सर्व निर्णय पुनरावलोकन करण्यायोग्य असावेत आणि खेळावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करतो. यामागील कल्पना म्हणजे खिलाडूवृत्तीची भावना जिवंत ठेवणे ही आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज अँरिक नोर्कियाने आयपीएल २०२५ मध्ये त्याचा पहिला सामना खेळला आहे. तो बऱ्याच काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. मात्र, आता तो पुन्हा मैदानात उतरला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नोर्कियाने ३ षटके टाकली असून त्याने २३ धावा देऊन १ गडी बाद केला.