
वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा दूसरा सामना
मुंबई इडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने
केकेआरविरुद्ध रोहित शर्मा फॉर्ममध्ये येत असल्याचा उल्लेख
Tata IPL 2026 MI vs KKR Live: कालपासून आयपीएलचा (MI vs KKR) रणसंग्राम सुरू झाला आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाल्यावर 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. मात्र भारताचे निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्माबद्दल भाकीत केले आहे. त्यांच्या या विधानामुळे क्रिकेट विश्वास एकच चर्चा सुरू झाली आहे.
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने 5 वेळेस विजेतेपद पटकावले आहे. आज मुंबईचा संघ कोलकाताविरुद्ध भिडणार आहे. केकेआरविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड अत्यंत चांगला राहिला आहे. रोहित शर्माने केकेआरविरुद्ध एक हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
वानखेडेवर सन्नाटा! KKR विरुद्ध MI च्या संघाला ‘ग्रहण’; Bumrah अन् ‘या’ खेळाडूंशिवाय लढावे लागणार?
रोहित शर्माबद्दल काय म्हणाले कृष्णमाचारी श्रीकांत?
रोहित शर्माबद्दल बोलताना कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, “रोहित शर्मासाठी केकेआर म्हणजे अगदी बदाम हलव्यासारखी होती. रोहित शर्मा कोलकाताच्या गोलंदाजांचा मनसोक्त समाचार घ्यायचा. कोलकाताचा संघ समोर येताच रोहित शर्मा एकदम फॉर्म मध्ये असल्यासारखा खेळतो.” आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात सामना होणार आहे.
KKR विरुद्ध MI च्या संघाला ‘ग्रहण’
मुंबई आणि केकेआर हे दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी मुंबईच्या संघात महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आज जोरदार सराव केला. या सराव सत्रात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सहभागी झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?
तसेच मुंबई इंडियन्समध्ये मिचेल सँटनर आणि विल जॅक्स हे दोन खेळाडू देखील जोडले जाणार नसल्याचे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. सँटनर तेव्हा न्यूझीलंडचा कर्णधार होता. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे तो मुंबई इंडियन्समध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे समजते आहे. लवकरच तो संघाशी जोडला जाणार आहे.
जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमधून सावरला असल्याचे समोर येत होते. तयाचा फिटनेस रिपोर्ट क्लिअर असल्याचे देखील म्हटले जात होते. तसेच तो दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या संघाशी जोडला गेला होता. मात्र आज सराव सत्रात नसल्याने बुमराह आजच्या सामन्यात खेळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संघाचे आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे.