केकेआर विरुद्ध मुंबईला मोठा धक्का (फोटो- सोशल मिडिया)
आज मुंबई विरुद्ध केकेआर यांच्यात रंगणार सामना
मिचेल सँटनर आणि विल जॅक्स नसणार उपलब्ध
बुमराह आजच्या सराव सत्रात नसल्याचे आले समोर
Tata IPL 2026 MI vs KKR Live: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. दोन्ही संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे मैदानात उतरताना दिसून येतील. मुंबई इंडियन्सकडे आपला १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. मात्र सामना सुरू होण्याआधीच संघाला मोठा धक्का बसला असल्याचे समोर आले आहे.
मुंबई आणि केकेआर हे दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी मुंबईच्या संघात महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आज जोरदार सराव केला. या सराव सत्रात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सहभागी झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
तसेच मुंबई इंडियन्समध्ये मिचेल सँटनर आणि विल जॅक्स हे दोन खेळाडू देखील जोडले जाणार नसल्याचे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. सँटनर तेव्हा न्यूझीलंडचा कर्णधार होता. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे तो मुंबई इंडियन्समध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे समजते आहे. लवकरच तो संघाशी जोडला जाणार आहे.
IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?
जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमधून सावरला असल्याचे समोर येत होते. तयाचा फिटनेस रिपोर्ट क्लिअर असल्याचे देखील म्हटले जात होते. तसेच तो दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या संघाशी जोडला गेला होता. मात्र आज सराव सत्रात नसल्याने बुमराह आजच्या सामन्यात खेळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संघाचे आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे.
मुंबई पलटण 14 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडणार?
मुंबई इंडियन्स आपला आजचा सामना जिंकून 14 वर्षांपासूनची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करेल. आज मुंबई पलटण याच इराद्याने मैदानात उतरेल. तर 14 वर्षांपासून असलेला तो रेकॉर्ड कोणता आहे ते पाहुयात. मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र गेले 14 वर्षांपासून त्यांना लीगमध्ये पहिला सामना जिंकता आलेला नाहीये. त्यामुळे आज हा रेकॉर्ड मोडण्याची संधी मुंबई संघाकडे असणार आहे.
रूको जरा सब्र करो! MI चा ‘सिक्सर किंग’ येतोय; IPL 2026 मध्ये पलटण 14 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडणार?
मुंबई इंडियन्स संघाने 2012 मध्ये पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर 2025 पर्यंत मुंबई आपला पहिला सामना जिंकू शकलेली नाहीये. त्यामुळे आज मुंबई पलटण आपला 14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. दरम्यान दुसऱ्या संघाबाबत विचार केल्यास कोलकाता नाइट रायडर्स संघाचा वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एवढा काही खास रेकॉर्ड राहिलेला नाही.






