Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने एक विकेट घेतली.  या विकेटसह, कुलदीप आशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची चांगली कामगिरी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 27, 2025 | 03:35 PM
IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर 
Follow Us
Close
Follow Us:
  • शेवटचा सुपर ४ सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला
  • श्रीलंकेविरुद्ध कुलदीप यादवने  एक विकेट घेतली 
  • या विकेटसह कुलदीप टी २० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे
Asia cup 2025 final IND vs PAK : आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मधील शेवटचा सुपर ४ सामना काल श्रीलंका आणि भारत या दोन संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने सुपर ओव्हर सामन्यात विजय मिळवला. यासह, भारताने स्पर्धेत सलग सहा सामने जिंकण्याचा मोठा कारनामा केला आहे.  भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आशिया कप २०२५ मध्ये शानदार गोलंदाजी करताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने चरिथ असलंकाचा बळी घेऊन एक विकेट घेतली.  या विकेटसह, कुलदीप यादव आशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

हेही वाचा : IND VS PAK : ‘आम्ही त्याच पद्धतीने खेळू…’, अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला सूर्याचा अनोख्या शैलीत इशारा..

आशिया कप टी२० क्रिकेट  रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्ध, कुलदीप यादवने चार षटकांत ३१ धावा देत एक बळी घेतला. आतापर्यंत या हंगामात कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत सहा सामन्यांत १३ विकेट चटकावल्या आहेत.  यापूर्वी, अमजद जावेद १२ विकेटसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता, तर भुवनेश्वर कुमारने ११ विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवची आशिया कपमधील कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम रचला आहे.

कुलदीप मलिंगाच्या विक्रमाच्या जवळ

आशिया कपमध्ये आतापर्यंत  सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर जमा आहे. मलिंगाने एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात एकत्रितपणे एकूण ३३ बळी टिपले आहेत. आता कुलदीप यादव ३२ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. जर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर तो मलिंगाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

कुलदीप यादव आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करत आहे, त्याची उत्कृष्ट गोलंदाजी पाकिस्तान संघासाठी डोकेदुखीचे कारण बनली आहे. आशिया कप २०२५ मध्ये कुलदीपने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३ आणि दुसऱ्या सामन्यात १ विकेट घेतली आहे. अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या कामगिरीमुळे विरोधी संघाचे मनोबल कमकुवत होण्याची शक्यता आहे.

कुलदीपकडून अंतिम फेरीमधील अपेक्षा वाढल्या

फिरकीपटू कुलदीप यादव सातत्याने प्रभावी गोलंदाजी करत आहे त्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत  आहे. त्याच्या आगामी गोलंदाजीवरून चाहते आणि तज्ञांना सामन्याच्या निकालाबद्दल मोठ्या आशा लागून आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात कुलदीपची कामगिरी टीम इंडियासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND VS PAK : PCB प्रमुखाने उचलले लज्जास्पद पाऊल! ICC कडून कारवाई झालेल्या हरिस रौफला दिला ‘या’ गोष्टीत दिलासा

 

Web Title: Kuldeep yadav increased pakistans concerns created history befor final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • IND vs SL
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…
1

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…

IND vs SL Pitch Report : भारत आज 2025 मधील शेवटचा क्रिकेट सामना खेळणार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?
2

IND vs SL Pitch Report : भारत आज 2025 मधील शेवटचा क्रिकेट सामना खेळणार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?

IND VS PAK : PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींनी लाज सोडली! आशिया कप ट्रॉफी पाहिजे असेल तर घातली नवी अट
3

IND VS PAK : PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींनी लाज सोडली! आशिया कप ट्रॉफी पाहिजे असेल तर घातली नवी अट

स्मृती मानधनाने नवा विक्रम केला नावावर, 10000 धावा करणारी चौथी महिला! मिताली राजचा रेकाॅर्ड मोडण्याचा मार्गावर…
4

स्मृती मानधनाने नवा विक्रम केला नावावर, 10000 धावा करणारी चौथी महिला! मिताली राजचा रेकाॅर्ड मोडण्याचा मार्गावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.