हरिस रौफ आणि मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप(Asia cup 2025 )स्पर्धेत २१ सप्टेंबर २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर ४ सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. हा सामना खूप वादग्रस्त ठरला. या सामन्यादरम्यान, पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफ क्षेत्ररक्षण करताना त्याच्या वादग्रस्त वर्तन केल्याने चांगलाच वाद रंगला. रौफने सीमारेषेवर ६-० चा फलक दाखवला आणि खाली पडलेल्या लढाऊ विमानाकडे इशारा करण्याची कृती केली. ही कृती क्रिकेट शिष्टाचाराच्या विरुद्ध मानली जाते. परिणामी, आयसीसीकडून हरिस रौफवर कारवाई करण्यात आली आणि त्याच्या सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आली. त्याची कृती अनुचित वर्तन असले तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी हरिसच्या समर्थ केले आहे आणि एक मोठे पाऊल उचलले आहे.
वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वी हे वैयक्तिकरित्या हरिस रौफचा दंड भरणार आहेत. म्हणजेच हरिसला त्याच्या पगारातून किंवा वैयक्तिक निधीतून दंड भरण्याची गरज नाही. नक्वी यांचे हे पाऊल यासाठी देखील महत्त्वाचे आहे, कारण ते केवळ पीसीबीचेचे अध्यक्षच नाहीत तर एसीसीचे अध्यक्ष देखील आहेत. यामुळे त्यांच्या निर्णयामुळे क्रिकेट जगतात धक्कादायक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नक्वी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ते खेळाडूंना पाठिंबा देतील, विशेषतः जेव्हा ते संघात योगदान देत असतील आणि एकाच चुकीसाठी जास्त शिक्षा भोगत असतील.
१४ सप्टेंबर २०२५ रोजी खेळवण्यात आलेल्या लीग सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमारकडून आपला विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित करण्यात आला होता. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रार दाखल केली आणि आयसीसीकडून सूर्याला त्याच्या सामन्याच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आशिय कप स्पर्धेतील इतिहास पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान हे संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आधीच दोन वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे. आता तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत ठेवण्याचे लक्ष्य भारतासमोर असणार आहे. तर पाकिस्तान या सामन्यात विजय मिळवून दोन परभवांचा बदला काढण्यास उत्सुक असेल.