लिटन दास(फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh and the Netherlands : बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने इतिहास रचला आहे. लिटन दा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशसाठी सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
पावसामुळे टी-२० मालिकेतील तिसरा सामना रद्द झाला. पण तरी देखील, लिटन दासने बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनचा विक्रम मोडीत काढला आहे. शाकिब अल हसनने बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३ अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. आता लिटन दासच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ अर्धशतकं जमा झाली आहे.
हेही वाचा : ZIM vs SL : झिम्बाब्वेच्या २१ वर्षांच्या खेळाडूकडून दिग्गजांना धोबीपछाड; ‘हा’ विक्रम मोडून रचला इतिहास..
नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात लिटन दासने ४६ चेंडूचा सामना करत ७३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. या अर्धशतकाच्या मदतीने त्याने आपले १४ वे अर्धशतक पूर्ण केले आणि आपलेच देश बांधवाचा विक्रम मोडीत काढला. ११० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लिटन दासने १२६.५२ च्या स्ट्राईक रेटने १९२७ धावा फटवल्या आहेत. या दरम्यान, त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ८३ इतकी राहिली आहे.
त्याच वेळी, बांगलादेशचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू शकिब अल हसनने मागील वर्षीच्या विश्वचषकानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घोषित केली होती. त्याने आतापर्यंत १२९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२१.२५ च्या स्ट्राईक रेटने २५५१ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान, त्याने १३ अर्धशतकं लागावळी आहेत. टी-२० मध्ये ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
हेही वाचा : ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?
तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. असला तरी बांगलादेशने तीन सामन्यांची मालिका २-० अशी आपल्या नावे केली. बांगलादेश संघाने मालिकेतील पहिला सामना ८ विकेट्सने जिंकला होता. पहिल्या सामन्यात लिटन दासने देखील अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्स संघ फक्त १०३ धावांवर गारद झाला होता. बांगलादेशने हे छोटे लक्ष्य एक विकेट गमावून पूर्ण केले आणि विजय मिळवला.