ब्रायन बेनेट(फोटो-सोशल मिडीय)
Zimbabwe vs Sri Lanka : झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज ब्रायन बेनेटने इतिहास रचला आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. वयाच्या २१ वर्षी त्याने जगातील दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंग, एबी डिव्हिलियर्स आणि बाबर आझम यांना पिछाडीवर टाकून नवा विक्रम रचला आहे. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने हरारे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात हा विक्रम रचला आहे. त्याने टी-२० मध्ये षटकार न मारता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला आहे.
हेही वाचा : Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!
श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा युवा फलंदाज ब्रायन बेनेटने १४२.११ च्या स्ट्राईक रेटने ५७ चेंडूंमध्ये ८१ धावांची वादळी खेळी केली आहे. त्याने या खेळीत एकूण १२ चौकार लगावले आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून एक देखील षटकार मारला नाही. आता त्याच्या या कामगिरीनंतर अनेक खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले आहेत.
यापूर्वी, टी-२० क्रिकेटमध्ये षटकार न मारता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या नावे जमा होता. परंतु, आता झिम्बाब्वेचा युवा फलंदाज ब्रायन बेनेट हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात षटकार न मारता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याच्या खेळीने तो आपल्या संघाला विजयी करू शकला नाही, या सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेला ४ विकेट्सने पराभव केला.
श्रीलंकेविरुद्ध ८१ धावांची खेळी करणारा ब्रायन बेनेटने जगातील ५ दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. यासह तो आता या यादीमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. यापूर्वी, एबी डिव्हिलियर्सने टी-२० मध्ये चौकार न मारता सर्वाधिक ७९* धावा फटकावल्या होत्या. यानंतर हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर जमा होता, परंतु आता झिम्बाब्वेच्या युवा फलंदाज ब्रायन बेनेटने या यादीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
हेही वाचा : IND vs PAK: Asia cup मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला! १३ वर्षांच्या इतिहासाला कलाटणी मिळेल?
आशिया कप २०२५ पूर्वी श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ सप्टेंबर रोजी झिम्बाब्वेच्या हरारे क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला आहे. या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला श्रीलंकेने ४ विकेट्सने पराभूत केले आहे आणि श्रीलंकेच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.