Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर (फोटो-सोशल मीडिया)
Personal Loans in India: एका नव्या अहवालामध्ये वैयक्तिक कर्जासंबधित धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. वाढत्या वैयक्तिक कर्जे ही सहसा आलिशान सुट्या किंवा महागडी गॅझेट्स घेण्यासाठी घेतल्याचा समज आहे. मात्र, वास्तविता वेगळी असून भारतातील बहुतेक लोक हे टूर किंवा वैयक्तिक गॅझेट खरेदीसाठी नव्हे तर वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्याने वैयक्तिक कर्जे काढत असल्याचे समोर आले आहे. पैसा बाजारच्या अलीकडील ग्राहक संशोधन अहवालात हे चिंताजनक वास्तव उघड झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा: EPFO 3.0: PF अकाऊंट विलिनीकरणासाठी माराव्या लागणार नाहीत ऑफिसमध्ये फेऱ्या! Transfer Request ने झटक्यात होईल काम
‘द पर्सनल लोन स्टोरी’ मध्ये भारतीय कुटुंबांसमोरील आर्थिक आव्हानांचे एक नवीन चित्र समोर आले आहे. या सर्वेक्षणातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे की, वैद्यकीय संकट हे भारतात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, अंदाजे ११% लोक आजारपण आणि रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात. या हाती आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, देशात वैद्यकीय उपचार महाग होत आहेत आणि लोकांकडे पुरेसे आरोग्य विमा संरक्षण नाही.
दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या टियर-१ शहरांमध्ये ही समस्या आणखी गंभीर आहे. या महानगरांमध्ये, वैद्यकीय संकटाच्या वेळी मदतीसाठी कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या १४% पर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेत, लहान टियर-२ शहरांमध्ये हा आकडा १०% आणि टियर ३ शहरांमध्ये ८% आहे.
हे देखील वाचा: Air Travel Expensive : नवी मुंबई ते दिल्ली तिकीटाचे दर 15000 रुपये, सलग सुट्ट्यांमुळे हवाई प्रवास महागला
घर दुरुस्तीचा खर्च हे देखील महत्वाचे कारण आहे
देशात केवळ आजारच नाही तर निवारा आणि घराची देखभाल ही देखील कर्ज घेण्याची प्रमुख कारणे आहेत. जवळजवळ अर्धे, किंवा ४८% लोक त्यांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा अनपेक्षित घर दुरुस्तीसाठी वैयक्तिक कर्ज निवडत असतात. शिवाय, लोकांचा एक महत्त्वाचा भाग त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी कर्ज घेत आहे. सुमारे ३६% लोक त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात.






