एबी डिव्हिलियर्स(फोटो-सोशल मीडिया)
The world’s 10 greatest batsmen in ODIs : दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन काही वर्ष झाली आहेत. तरी देखील त्याची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. तो नेहमी चर्चेत असतो. आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील टॉप-१० फलंदाजांची निवड केली आहे. हे १० जगातील दिग्गज फलंदाज असल्याचे त्याचे मत आहे. या यादीत त्याने जगातील विविध देशाकडून खेळणाऱ्या दिग्गज फलंदाजांची निवड केली आहे. चला जाणून घेऊया हे दिग्गज आहेत तरी कोण?
या दिग्गज फलंदाजांच्या यादीत भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली अव्वल स्थानी आहे. या यादीत डिव्हिलियर्सने स्वतःला दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला तिसऱ्या स्थानावर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला या यादीत चौथे स्थान दिले आहे. या टॉप १० यादीत भारतातील एकूण ४ खेळाडूंना स्थान दिली गेले आहे. ज्यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांची नावे आहेत.
हेही वाचा : ZIM vs SL : झिम्बाब्वेच्या २१ वर्षांच्या खेळाडूकडून दिग्गजांना धोबीपछाड; ‘हा’ विक्रम मोडून रचला इतिहास..
एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखती दरम्यान विराट कोहलीबद्दल भावुक विधान केले आहे. तो म्हणाला की, “आम्हाला आणि भारताला कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची खूप कमी जाणवते. तो माझा खूप चांगला मित्र असून मला त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याची खूप इच्छा आहे. पण, किमान तो अजून देखील पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात उपस्थित आहे आणि आशा आहे की तो येणारे अनेक वर्षे खेळत राहील.”
डिव्हिलियर्स आणि कोहली यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. आयपीएलमध्ये हे दोघे दिग्गज आरसीबीकडून एकत्र खेळले आहेत. दोघांनीही अनेक संस्मरणीय अशा भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. जेव्हा आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने विजेतपद जिंकले तेव्हा देखील डिव्हिलियर्स आणि गेल त्याच्यासोबत मैदानावर दिसून आले होते. त्यांनी ट्रॉफीसह आनंद साजरा केला होता.