ऋषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
दिल्लीने एलएसजीचा 6 विकेट्सने केला पराभव
संजीव गोएंका अन् पंतमध्ये शाब्दिक चकमक
ऋषभ पंत आहे एलएसजीचा कर्णधार
Rishabh Pant Vs Sanjiv Goenka: काल लखनौच्या एकाना स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ असा सामना पार पडला या रोमांचकारी सामन्यात दिल्लीने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर लखनौचे मालक संजीव गोएंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी ही केएल राहुलची पुनरावृत्ती तर नाही ना अशी चर्चा करत असल्याचे समोर येत आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संजीव गोएंका आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. काल दिल्ली कॅपिटल्सने लखनौने आपल्याकडे खेचलेला सामना जिंकला आहे. त्यामुळे संजीव गोएंका हे ऋषभ पंतला ओरडत तर नाहीयेत ना अशी चर्चा हा व्हिडिओ पाहून केली जात आहे. तसेच ही केएल राहुलची पुनरावृत्ती तर नाही ना असे देखील म्हंटले जात आहे.
LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज
केएल राहुलसोबत घडलेली घटना
संजीव गोएंका आणि केएल राहुल यांचा देखील असाच एक व्हिडिओ समोर आला होता. तेव्हा केएल राहुल लखनौचा कर्णधार होता. हा व्हिडिओ 2024 मधला होता. मात्र आता समोर आलेला व्हिडिओ पाहून तसे काही घडले असेल असे दिसून येत नाहीये. मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Sanjiv Goenka and Rishabh pant 😭 pic.twitter.com/0RzMSkp0vE — Faiyaz (@FaiyazWhat) April 1, 2026
दिल्लीचा 6 विकेट्सने विजय
लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. लखनौने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 143 धावा केल्या. त्यानंतर 144 धावांचा पाठलाग (IPL 2026) करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला. मात्र मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले. दिल्ली कॅपिटल्सने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
LSG Vs DC Live: लखनौसमोर समीर रिझवीचा धुमाकूळ; एकाना हादरलं, दिल्लीचा 6 विकेट्सने विजय
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला. तर पथूम निसांका केवळ 1 धावा करून बाद झाला. तर डावखुरा फलंदाज नितीश राणा 15 धावा करून स्लीपमध्ये असलेल्या खेळाडूकडे झेल देऊन बाद झाला. तर प्रिन्स यादवने कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद केले. त्याआधी प्रिन्स यादवने निसांकाला बाद केले. मोहसीन खानने नितीश राणाला बाद केले. समीर रिझवी स्टब्सने 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून अडचणीत असलेल्या दिल्लीला विजयापर्यंत पोहोचवले.






