IPL 2024 Points Table Delhi Capitals : आयपीएलचा हंगाम सध्या ऐन मोसमात आलेला असताना, कालच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आणि पॉइंट टेबलमध्येही मोठी झेप घेतली. तर, गुजरात टायटन्स संघ या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. ना फलंदाज काही अप्रतिम करू शकले ना गोलंदाजांनी आपली छाप सोडली.
प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका
दिल्लीच्या विजयामुळे काही संघांना आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. त्याचे आता 6 गुण झाले आहेत.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या पराभवामुळे नेट रनरेटमध्ये मोठा फटका बसला आहे. गुजरातचे देखील 6 गुण आहेत, परंतु त्यांचा रन रेट -1.303 वर पोहोचला आहे. आयपीएल 2024 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने देखील आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 3 विजय नोंदवले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे दिल्ली गुणतालिकेत गुजरातपेक्षा एक स्थान वर आहे.
हे संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर
राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या 8 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे देखील सध्या 8 गुण आहेत, परंतु KKR (+1.399) चा नेट रन रेट CSK (+0.726) पेक्षा चांगला आहे. सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचे 8 गुण आहेत, परंतु त्यांच्या संघाचा नेट रन रेट सध्या +0.502 आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचे सध्या 6 गुण आहेत आणि संघ +0.038 च्या धावगतीने पाचव्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकल्यानंतर दिल्लीची सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असून, गुजरातच्या पराभवामुळे ती सातव्या स्थानावर घसरली आहे.
‘या’ संघांना बाहेर जाण्याचा खतरा
पॉइंट टेबलमधील शेवटच्या 3 संघांबद्दल बोलायचे झाले तर, आठव्या स्थानावर पंजाब किंग्जचे सध्या 4 गुण आहेत. नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सचेही 4 गुण आहेत, पण नेट रन रेटच्या बाबतीत पंजाब (-0.218) मुंबईपेक्षा (-0.234) पुढे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटच्या स्थानावर आहे, ज्यांना आतापर्यंत फक्त 2 गुण जमा करता आले आहेत.