फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मनु भाकर-गुकेश : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघाने ६ मेडलची कमाई केली होती यामध्ये अमन शेहरावत, नीरज चोप्रा, स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंह, मनु भाकर या खेळाडूंनी भारतासाठी पदकांची कमाई केली. त्याचबरोबर भारताचा युवा चेस खेळाडू यांची निवड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चॅलेंजर स्पर्धेमध्ये विजय मिळवून वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेन याला चॅलेंज केले होते. यामध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये डिंग लिरेन याला पराभूत करून इतिहास रचला आणि जगातला सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन झाला. आता भारताच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आज सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये कोणते खेळाडू आहेत यावर एकदा नजर टाका.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी २ पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारा डी गुकेश आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनाही खेलरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. पॅरा ॲथलीट प्रवीणलाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीणने पुरुषांच्या उंच उडी T६४ प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
एकच मैदान, कोहली आणि जडेजा खेळणार वेगवेगळ्या संघातून? रणजी ट्रॉफीमध्ये होऊ शकते चकमक
२२ वर्षीय मनू भाकर ही ऑलिम्पिकच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली ॲथलीट ठरली आहे. मनूने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. दुसरीकडे, १८ वर्षीय गुकेश गेल्या महिन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून आतापर्यंतचा सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. महान विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आहे.
Congratulations to Dommaraju Gukesh, Harmanpreet Singh, Praveen Kumar & Manu Bhaker on recieving the Major Dhyan Chand Khel Ratna Award.
Also congratulations to all the Arjuna & Dronacharya awardees.#NationalSportsAwards2024 pic.twitter.com/RvgtNiLzsQ
— Rambo (@monster_zero123) January 17, 2025
चार खेलरत्न पुरस्कारांव्यतिरिक्त ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ज्यामध्ये १७ पॅरा ॲथलीट उपस्थित आहेत. पॅरा ऍथलीट्सनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्यांनी ७ सुवर्ण आणि ९ रौप्यपदकांसह २९ पदके जिंकली होती. पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत, नेमबाज स्वप्नील कुसळे आणि सरबज्योत सिंग आणि पुरुष हॉकी संघातील खेळाडू जर्मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
सर्व खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना २५ लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते. क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचा उद्देश क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरी आणि कामगिरीची दखल घेणे हा आहे.