फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली – रवींद्र जडेजा : भारतीय क्रिकेट संघाला घरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून ०-३ आणि त्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागल्याने बीसीसीआय खूप कडक झाले आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या सातत्याने निराशाजनक कामगिरीमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजर आगामी सामान्यांकडे असणार आहे. भारताचे अनेक खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश भारतीय कोच आणि बीसीसीआयने दिले आहेत.
Virat Kohli : विराट कोहलीने चाहत्यांना फटकारले, डोळ्यात दिसला राग, म्हणाला – ‘माझा रस्ता अडवू नका…’
नवीन १० गुणांचे धोरण लागू करण्यात आले आहे, ज्या अंतर्गत बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य असेल. आतापर्यंत, विराट कोहलीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही, परंतु अलीकडील अहवालात असे समोर आले आहे की विराट लवकरच राजकोटला जाऊन दिल्ली संघात सामील होऊ शकतो. परंतु अजुनपर्यत यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
क्रिकबझच्या मते, विराट कोहलीने अद्याप स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत डीडीसीएशी संपर्क साधलेला नाही. डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी पुन्हा सांगितले की, विराटने आतापर्यंत त्यांच्याशी संपर्क साधला नाही. मात्र २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात कोहली दिल्लीकडून खेळू शकतो, अशी शक्यता अजूनही आहे. कोहलीने गेल्या १२ वर्षांत एकही देशांतर्गत सामना खेळलेला नाही, पण क्रिकबझच्या मते, कोहली हा सामना खेळो की नाही, तो दिल्ली संघात सामील होऊ शकतो.
Champions Trophy साठी हार्दिक-रोहितची ‘खास’ तयारी, व्हिडिओ आला समोर
दिल्ली-सौराष्ट्रचा हा सामना २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे, जो निःसंशयपणे खूप खास असेल. कारण ऋषभ पंतने दिल्लीकडून खेळण्यास होकार दिला असून त्याला कर्णधारपद दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. हा सामना खास असण्याचे एक कारण म्हणजे रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून फक्त देशांतर्गत खेळला आहे, मात्र आजतागायत त्याचे खेळणे निश्चित झालेले नाही. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे आहे की जडेजा खेळण्याची शक्यता आहे, परंतु अद्याप त्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला नाही.
भारताचा संघ २२ जानेवारीपासून T२० मालिकेला सुरुवात करणार आहे, या दिनी मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच T२० सामान्यांची मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार पद अक्षर पटेलकडे सोपवण्यात आले आहे. यामध्ये भारताच्या संघाची T२० मध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.