Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs GT : प्रसिद्ध कृष्णाचा पहिल्याच चेंडू अन् सूर्यकुमार यादव जमिनीवर कोसळला! पहा Video

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरु असताना प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला होता, यावेळी चेंडू टाकला आणि तो चेंडू सूर्याच्या हेल्मेटला लागला आणि सूर्यकुमार यादव मैदानावर कोसळला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2025 | 11:34 PM
फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया

फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

सूर्यकुमार यादव मैदानात कोसळला : मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरु होता. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने चार विकेट्स गमावले होते. यावेळी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाजी करत असताना प्रसिद्ध कृष्णाचा पहिलाच चेंडू सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटला लागला आणि तो जमिनीवर मैदानातच कोसळला. यावेळी काही वेळ संपूर्ण स्टेडियम हे शांत झाले होते आणि यावेळी असे वाटले की दोन मिनिटांसाठी सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत झाली आहे. पण काही वेळासाठी तो स्तब्ध झाला होता त्यानंतर तो पुन्हा खेळण्यासाठी उठला आणि त्याने फलंदाजी केली.

Suryakumar Yadav got hit on the helmet off Prashid Krishna’s bowling 🤯

We hope it’s nothing serious 🙏

📸: JioHotstar#IPL2025 #GTvsMI #SuryakumarYadav #PrashidKrishna #CricketTwitter pic.twitter.com/bImdVhJSsk

— InsideSport (@InsideSportIND) March 29, 2025

मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यामधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादवने केल्या आणि त्याने २८ चेंडूंमध्ये ४८ धावा करून बाद झाला. त्याच्याव्यतिक्रित तिलक वर्माने संघासाठी ३९ धावा केल्या.

RCB ची कामगिरी पाहून एबी डिव्हिलियर्सचा आनंद गगनात! म्हणाला गेल्या हंगामापेक्षा संघ…, Video शेअर करून व्यक्त केल्या भावना

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने चमत्कार केला. साई सुदर्शनने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या तर शुभमन गिलने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. याशिवाय जोस बटलरने २४ चेंडूत ३९ धावा केल्या. तीन टॉप ऑर्डर फलंदाजांव्यतिरिक्त, इतर कोणताही जीटी फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. जीटीने २० षटकांत ८ गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या.

मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २९ धावा देत २ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी १ यश मिळाले.

MI vs GT : प्रसिद्ध कृष्णाचा पहिल्याच चेंडू अन् सूर्यकुमार यादव जमिनीवर कोसळला! पहा Video

शुभमन गिलची कमालीची कामगिरी

शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही स्टेडियममध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या बाबतीत, त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे , ज्याने वानखेडे स्टेडियमवर हा पराक्रम करण्यासाठी ३१ डाव ​​घेतले होते. गिलने केवळ २० डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याच वेळी, एकाच आयपीएल ठिकाणी सर्वात जलद १००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युनिव्हर्स बॉसने केवळ १९ डावांमध्ये ही कामगिरी केली.

Web Title: Mi vs gt match prasidh krishna ball hit suryakumar yadav helmet and the batsman fell to the field video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 11:11 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • MI vs GT
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
1

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?
2

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
3

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
4

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.