फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
सूर्यकुमार यादव मैदानात कोसळला : मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरु होता. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने चार विकेट्स गमावले होते. यावेळी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाजी करत असताना प्रसिद्ध कृष्णाचा पहिलाच चेंडू सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटला लागला आणि तो जमिनीवर मैदानातच कोसळला. यावेळी काही वेळ संपूर्ण स्टेडियम हे शांत झाले होते आणि यावेळी असे वाटले की दोन मिनिटांसाठी सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत झाली आहे. पण काही वेळासाठी तो स्तब्ध झाला होता त्यानंतर तो पुन्हा खेळण्यासाठी उठला आणि त्याने फलंदाजी केली.
Suryakumar Yadav got hit on the helmet off Prashid Krishna’s bowling 🤯
We hope it’s nothing serious 🙏
📸: JioHotstar#IPL2025 #GTvsMI #SuryakumarYadav #PrashidKrishna #CricketTwitter pic.twitter.com/bImdVhJSsk
— InsideSport (@InsideSportIND) March 29, 2025
मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यामधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादवने केल्या आणि त्याने २८ चेंडूंमध्ये ४८ धावा करून बाद झाला. त्याच्याव्यतिक्रित तिलक वर्माने संघासाठी ३९ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने चमत्कार केला. साई सुदर्शनने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या तर शुभमन गिलने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. याशिवाय जोस बटलरने २४ चेंडूत ३९ धावा केल्या. तीन टॉप ऑर्डर फलंदाजांव्यतिरिक्त, इतर कोणताही जीटी फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. जीटीने २० षटकांत ८ गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या.
मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २९ धावा देत २ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी १ यश मिळाले.
MI vs GT : प्रसिद्ध कृष्णाचा पहिल्याच चेंडू अन् सूर्यकुमार यादव जमिनीवर कोसळला! पहा Video
शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही स्टेडियममध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या बाबतीत, त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे , ज्याने वानखेडे स्टेडियमवर हा पराक्रम करण्यासाठी ३१ डाव घेतले होते. गिलने केवळ २० डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याच वेळी, एकाच आयपीएल ठिकाणी सर्वात जलद १००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युनिव्हर्स बॉसने केवळ १९ डावांमध्ये ही कामगिरी केली.